OTT | ‘अ‍ॅस्पिरेंट्स’पासून ते ‘पर्मनंन्ट रूममेट्स’पर्यंत, कॉमेडी-ड्रामा आणि इमोशन्सनी परिपूर्ण TVFच्या ‘या’ सीरीज करतील भरपूर मनोरंजन!

| Updated on: Aug 07, 2021 | 7:58 AM

OTT वर रिलीज झालेल्या बहुतेक वेब सीरीज या तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवल्या जातात. विशेषत: TVFच्या म्हणजेच  ‘द व्हायरल फीवर’वरील सर्वच वेब सीरीज या तरुणांसाठी बनवल्या गेल्या आहेत.

OTT | ‘अ‍ॅस्पिरेंट्स’पासून ते ‘पर्मनंन्ट रूममेट्स’पर्यंत, कॉमेडी-ड्रामा आणि इमोशन्सनी परिपूर्ण TVFच्या ‘या’ सीरीज करतील भरपूर मनोरंजन!
Web Series
Follow us on

मुंबई : OTTवर रिलीज झालेल्या वेब सीरीजनी आपल्या मजबूत आशयासह प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याच वेळी, ते त्या अनेक स्टार्ससाठी एक उत्तम व्यासपीठ असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. OTT वर रिलीज झालेल्या बहुतेक वेब सीरीज या तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवल्या जातात. विशेषत: TVFच्या म्हणजेच  ‘द व्हायरल फीवर’वरील सर्वच वेब सीरीज या तरुणांसाठी बनवल्या गेल्या आहेत. प्रेम, अभ्यास, वाद, करिअर, मैत्री, त्रास, कुटुंब अशा सगळ्या गोष्टी, ज्यात आजचा तरुण वर्ग गुंतलेला आहे, या सर्व गोष्टी या वेब सीरीजमध्ये दाखवल्या आहेत.

चला तर, आज आम्ही तुम्हाला TVFच्या अशाच काही निवडक वेब सीरीज बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तुम्ही देखील या विकेंडला आणखी मनोरंजक बनवू इच्छित असाल तर या सीरीज नक्की पाहा.

ट्रिपलिंग

या सीरीजचे दोन भाग आहेत. यात सुमीत व्यास, मानवी गग्रू आणि अमोल पराशर या सीरीजमध्ये दिसले होते. ही मालिका चंदन, चंचल आणि चितवन या तीन भावंडांवर आधारित आहे, जे रोड ट्रिपला जातात. या मालिकेत तुम्हाला विनोद, भावना, कौटुंबिक कलह, सर्व काही पाहायला मिळेल. समीर सक्सेना दिग्दर्शित या सीरीजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

पर्मनंन्ट रूममेट्स

एखाद्यावर प्रेम करणे सोपे असते, परंतु आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्यासोबत आयुष्यभर राहणे वाटते तितके सोपे नसते. या सीरीजमध्ये सुमित व्यास आणि निधी सिंह मुख्य भूमिकेत आहेत. दोघांची केमिस्ट्री अप्रतिम आहे. तसेच, कधी कधी त्यांचा रोमान्स, तर कधी भांडणे प्रेक्षकांना खूप हसवतात. या सीरीजचे दोन भाग 2014 आणि 2016मध्ये आले आहेत.

गुल्लक

जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता आणि हर्ष मायर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरीजची कथा तुम्हाला प्रत्येक भावनेचा पैलू दाखवेल. ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे, ही पाहून प्रत्येकाला असे वाटेल की, हे माझ्या कुटुंबात घडते. टीव्हीएफच्या या सीरीजमध्ये तुम्हाला हसू देखील येईल आणि तुम्हाला एक भावनिक प्रवास देखील घडेल.

कोटा फॅक्टरी

कोटा फॅक्टरी 2019मध्ये रिलीज झाली होती. मयूर मोरे, रंजन राज, आलम खान, जितेंद्र कुमार, रेवती पिल्ले आणि एहसास चन्ना यांच्या भूमिका आहेत. राघव सुब्बू दिग्दर्शित, ही सीरीज कोटा येथे अभ्यासासाठी येणाऱ्या मुलांच्या जीवनाचे चित्रण करते. अभ्यासाबद्दलचा ताण, तसंच आयुष्याची गोंधळ दाखवला गेला आहे.

अ‍ॅस्पिरेंट्स

TVF ची ही वेब सीरीज या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाली होती. नवीन कस्तुरिया, शिवंकित परिहार, अभिलाष थपलियाल, नमिता गुबे आणि सनी हिंदुजा मुख्य भूमिकेत आहेत. आयएएस बनण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात काय बदल होतात, त्यांच्या मैत्री आणि प्रेमावर काय परिणाम होतो, हे सर्व या सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. टीव्हीएफची ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

(Aspirants to Permanent roommates OTT platform TVF famous web series must watch)

हेही वाचा :

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील हंगाम्याला भोजपुरी तडका लागणार, ‘या’ अभिनेत्रीची ग्रँड एंट्री होणार!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!