’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!

झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळणार आहे. 5 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकांपैकीच एक म्हणजे “माझी तुझी रेशीमगाठ" (Majhi Tujhi Reshimgath).

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय...’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!
प्रार्थना बेहेरे
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 11:14 AM

मुंबई : झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळणार आहे. 5 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकांपैकीच एक म्हणजे “माझी तुझी रेशीमगाठ” (Majhi Tujhi Reshimgath). या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तब्बल दहा वर्षानंतर प्रार्थना बेहेरे छोट्या पडद्यावर पुरागमन करतेय. या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनाने मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय.

पाहा प्रार्थनाची पोस्ट :

काय म्हणाली प्रार्थना?

‘10 वर्षांनी टिव्ही वर पुनरागमन करते आहे… तुमच्या घरातली, अगदी तुमच्यातली एक होण्यासाठी… तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, हीच सदिच्छा…!!!

तुमचीच प्रार्थना बेहेरे !!!…

“माझी तुझी रेशीमगाठ ”

आगामी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने ही खास पोस्ट लिहिली आहे.

श्रेयस तळपदे नायकाच्या भूमिकेत!

अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे देखील या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि या मालिकेची झलक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी गोष्ट!

याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “पुन्हा एकदा आपल्या मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका खूप वेगळी आहे ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल.”

(Majhi Tujhi Reshimgath Zee Marathi New Serial Actress Prarthana Behere share special post for fans)

हेही वाचा :

अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय, अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरची भावनिक पोस्ट

‘मुघल-ए-आझम’च्या निर्मितीवर खर्च झाला पाण्यासारखा पैसा, तिकिटासाठीही चार दिवस रांगेत उभे होते प्रेक्षक!

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.