कॅमेऱ्यासमोर महिलेला घातली आंघोळ, काढला टी-शर्ट, एल्विश यादवच्या शोमधील तो Video पाहून प्रेक्षक संतप्त

यूट्यूबर एल्विश यादवचा 'एंगेज्ड 2' हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच आता यामधील एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.

कॅमेऱ्यासमोर महिलेला घातली आंघोळ, काढला टी-शर्ट, एल्विश यादवच्या शोमधील तो Video पाहून प्रेक्षक संतप्त
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 22, 2026 | 9:26 AM

Elvish Yadav : लोकप्रिय यूट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादव सध्या त्याच्या नव्या डेटिंग शोमुळे चर्चेत आला आहे. तो अभिनेत्री जिया शंकर हिच्यासोबत ‘एंगेज्ड 2’ हा शो होस्ट करत आहे. मात्र, या शोमधील कथित बोल्ड कंटेंटमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार वर 14 फेब्रुवारीपासून ‘एंगेज्ड 2’ स्ट्रीम होत आहे. सुरुवातीपासूनच या शोची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे यात दाखवले जाणारे प्रौढ स्वरूपाचे टास्क आणि सीन.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये काही स्पर्धक कॅमेऱ्यासमोर अतिशय धाडसी टास्क करताना दिसत आहेत. काही दृश्यांमध्ये स्पर्धक एकमेकांशी अतिशय जवळीक दाखवताना दिसतात. एका व्हिडिओत एक स्पर्धक आपल्या महिला जोडीदाराला कॅमेऱ्यासमोर आंघोळ घालताना दिसतो आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका टास्कदरम्यान पुरुष स्पर्धक आपल्या महिला जोडीदाराचा टी-शर्ट हात न लावता तोंडाने काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. या प्रकारच्या दृश्यांमुळे शोवर ‘फॅमिली ऑडियन्ससाठी योग्य नाही’ अशी टीका होत आहे.

सोशल मीडियावर संताप

या शोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी शो निर्मात्यांवर टीका करत अशा प्रकारचे कंटेंट प्रसारित करण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी हा शो त्वरित बंद करण्याची मागणीही केली आहे. होस्ट म्हणून एल्विश यादवलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे या शोला मोठी प्रसिद्धी मिळाली असली तरी बोल्ड कंटेंटमुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिअॅलिटी आणि डेटिंग शोमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे अधिक लक्ष वेधण्यासाठी धाडसी आणि वादग्रस्त टास्क दाखवले जात असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. मात्र प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनंतर निर्माते पुढे कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी ‘एंगेज्ड 2’ हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us