‘हसगत’ आणि ‘पत्रापत्री’सोबत दिलीप प्रभावळकरांची ‘नवी गुगली’, नवी कथा ऐका स्टोरीटेलवर…

| Updated on: Mar 28, 2022 | 6:24 PM

‘स्टोरीटेल’ने नुकतेच त्यांच्या चार वेगवेगळ्या धाटणीचे लेखसंग्रह ऑडिओ स्वरूपात आणले आहेत. या सर्व लेखांचे सादरीकरण प्रत्यक्ष प्रभावळकरांच्याच आवाजात ऐकायला मिळत असल्याने हा एक दुग्धशर्करा योग म्हणता येईल.

हसगत आणि पत्रापत्रीसोबत दिलीप प्रभावळकरांची नवी गुगली, नवी कथा ऐका स्टोरीटेलवर...
दिलीप प्रभावळकर
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अभिनयातील सहजता, नेमकेपणा, भूमिका निवडीतील चोखंदळपणा व स्वीकारलेल्या भूमिकांना न्याय देण्याची वृत्ती, अभिनय  आणि लेखन या दोन्ही कलांनी मराठी नाट्य-चित्रपटक्षेत्रात आणि साहित्यक्षेत्रातही स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनिशी दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी आपले बळकट स्थान निर्माण करून प्रदीर्घ नाट्य-चित्र कारकिर्दीत घडवून प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशके राज्य केले आहे. विनोदी लेखनाची प्रचंड आवड असलेल्या प्रभावळकरांच्या साहित्य निर्मितील खटयाळ, मिश्कील, निरागस, खुमासदार शैलीद्वारे वाचक – श्रोत्यांसोबत संवाद साधण्याच्या विशेष हातोटीमुळे त्यांचा एक विशेष वाचक-रसिक वर्ग जगभर तयार झाला आहे. त्यांच्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे ‘स्टोरीटेल’ने (Storytel)  नुकतेच त्यांच्या चार वेगवेगळ्या धाटणीचे लेखसंग्रह ऑडिओ स्वरूपात आणले आहेत. या सर्व लेखांचे सादरीकरण प्रत्यक्ष प्रभावळकरांच्याच आवाजात ऐकायला मिळत असल्याने हा एक दुग्धशर्करा योग म्हणता येईल.

क्रिकेट, खेळाडू, खेळाडूंचं वर्तन, मैदानाबाहेरील घडामोडी अशा अनेक गोष्टींवर प्रभावळकरांनी खुमासदार लेख लिहिले. खळखळून हसायला लावणारे, वरकरणी मनोरंजनात्मक भासणारे हे लेख विसंगती टिपणारे आणि चिमटे काढणारेही आहेत. या लेखांचा संग्रह म्हणजे ‘नवी गुगली’. ‘षट्कार’ या निखिल वागळे संपादित क्रीडा-मासिकात दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे ‘गुगली’. हा महत्वाचा ऐवज खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी दस्तुरखुद्द प्रभावळकरांच्याच आवाजात ऐकताना धम्माल मनोरंजन होते. यासोबतच त्यांचा विनोदी ललित लेखसंग्रह ‘हसगत’ ऐकतानाही अशीच मजा येत राहते.

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध… हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले ‘उदयोग’ हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत…तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिश्किलपणा या ‘पत्रापत्री’त रंगत आणतो. या सर्व विविधांगी मनोरंजन करणाऱ्या कथा स्वतः प्रभावळकर आपल्या शेजारी बसून आपल्याला ऐकवत आहेत असा भास ऐकणाऱ्याला होत राहतो.

संबंधित बातम्या

Video : Urfi Javed फॅन्सी ड्रेस घालून आली, पण फोटो काढायला जागाच सापडेना… थेट वॉचमनशी भिडली

KGF Chapter 2 Trailer : आला रे आला ‘केजीएफ-2’ आला… नुसता ॲक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला सिनेमा प्रदर्शित होणार

शून्यातून यूट्यूब सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा प्रवास… Ganesh Shinde आणि Yogita Shinde यांनी उलगडला, सहज- साधा पण प्रेरणादायक…