KGF Chapter 2 Trailer : आला रे आला ‘केजीएफ-2’ आला… नुसता ॲक्शनचा धमाका, ‘या’ तारखेला सिनेमा प्रदर्शित होणार

KGF Chapter 2 Trailer : आला रे आला 'केजीएफ-2' आला... नुसता ॲक्शनचा धमाका, 'या' तारखेला सिनेमा प्रदर्शित होणार
केजीएफ-2

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा याचा बहुचर्चीत चित्रपट 'केजीएफ-2' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची सिनेरसिक वाट पाहत आहेत. हा सिनेमा याआधी मागच्या वर्षी रिलीज होणार होता. पण त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आयेशा सय्यद

|

Mar 28, 2022 | 5:22 PM

मुंबई : कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा (Yash) याचा बहुचर्चीत चित्रपट ‘केजीएफ-2’ (K G F 2) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यश, संजय दत्त (Sanjay Dutt) , रवीना टंडन (Raveena Tandon) हे कलाकार या सिनेमात पहायला मिळणार आहेत. यश, संजय दत्त, रवीना टंडन आणि चित्रपटाचा निर्माता करण जोहर (Karan Johar) यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. मागच्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची सिनेरसिक वाट पाहत आहेत. हा सिनेमा याआधी मागच्या वर्षी रिलीज होणार होता. पण त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता अखेर हा सिनेमा हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

ट्रेलर रिलीज

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा याचा बहुचर्चीत चित्रपट ‘केजीएफ-2’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात यशची कम्माल अॅक्टिंग भाव खावून जाते. शिवाय संजय दत्तचा हा लूकही किलर आहे. या चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर रवीना टंडन रामिका सेन नावाच्या नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा अॅक्शन मुव्ही बॉक्सऑफिसवरही कमाल करणार हे नक्की…

कमेंट बॉक्स

या ट्रेलरला चार कोटी चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय.या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये एक लाखाहून अधिक कमेंट पहायला मिळत आहेत. अनेकांनी कमेंट करून सिनेमाबाबत उत्सुकता असलयाचं म्हटलंय. एकाने “14 तारीख कधी उजाडतेय याची मी खूप मनापासून वाट बघतोय. फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहे”, असं म्हटलंय. तर दुसरा म्हणतो “मी यशचा खूप मोठा फॅन आहे त्याच्यासाठी मी हा सिनेमा बघणार आहे.” तर तिसऱ्याने म्हटलं “संजय दत्तचा लूक आणि त्याचे डोळे मला थिएटरपर्यंत खेचत नेत आहेत.”

तारीख पे तारीख

केजीएफ 2 हा सिनेमा मागच्या दोन वर्षापासून प्रदर्शनासाठी रखडला आहे. केजीएफ 2 चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर हा चित्रपट 16 जुलै 2021 रोजरी प्रदर्शित होणार होता. ही तारीखही पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा सिनेमा हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

Oscar मधल्या विल स्मिथ प्रकारावर नीतू कपूर यांची प्रतिक्रिया; ‘म्हणे महिला भावनांना…’

The Kashmir Files : “पंतप्रधानांनीच सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?”, शरद पवारांचा मोदींना सवाल

Lock Upp: “करिअरला रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं होतं”; अभिनेत्रीचा खुलासा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें