Lock Upp: “करिअरला रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं होतं”; अभिनेत्रीचा खुलासा

Lock Upp: करिअरला रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं होतं; अभिनेत्रीचा खुलासा
Payal Rohatgi
Image Credit source: Instagram

कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. पूनम पांडे, सना खान, निशा रावल यांसारख्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये आतापर्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi) तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट सांगितलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Mar 28, 2022 | 12:37 PM

कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. पूनम पांडे, सना खान, निशा रावल यांसारख्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये आतापर्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने (Payal Rohatgi) तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट सांगितलं आहे. एलिमिनेशनपासून वाचण्यासाठी तिला हे सिक्रेट सांगणं भाग होतं. आपलं करिअर रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं, असा खुलासा पायलने केला. “गेल्या 15 वर्षांपासून मी या इंडस्ट्रीत काम करतेय आणि एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या हातात काहीच काम नव्हतं. तेव्हा माझ्या करिअरला वाचवण्यासाठी मी तांत्रिक पूजा केली होती”, असं ती यावेळी म्हणाली.

काय म्हणाली पायल रोहतगी?

“कोणतीही सुशिक्षित महिला किंवा पुरुष अशा पद्धतीने करिअरला पुढे नेण्यासाठी तांत्रिक पूजा करण्याचा विचार करणार नाही. जरी मी ती पूजा केली, तरी ती गुपचूपपणे करायची असते. वशीकरण असं त्याला म्हणतात आणि ते मी करून पाहिलं होतं. दिल्लीतील एका पुजाऱ्याने मला एखाद्या व्यक्तीविषयी विचार करण्यास सांगितलं. त्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी त्याने ती पूजा करायला सांगितली होती. मी ते केलं, पण त्याचा मला काहीच फायदा झाला नाही. मी जर हे कोणाला सांगितलं तर कोणी माझ्यावर विश्वास करणार नाही, उलट माझी खिल्ली उडवतील असं मला वाटलं”, अशी कबुली पायलने दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi)

कंगनाची प्रतिक्रिया

पायलने वशीकरणबद्दल सांगताच कंगना जोरजोरात हसू लागली. “तर तू काळी जादू केलीस. काळी जादू करून तू लोकांना तुझ्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलास. मला वाटतं, पायल तू सुंदर आणि प्रतिभावान आहेस. तुला कुठल्याही तांत्रिकची गरज नाही. तू असंच कोणालाही वश करू शकतेस. जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले, तेव्हा माझ्यावर अनेकांनी काळ्या जादूचा आरोप केला. जेव्हा एखादी मुलगी यशस्वी होते, तेव्हा तिच्या कौशल्यावर शंका घेतली जाते”, असं कंगना म्हणाली.

RRR box office collection: पहिल्या वीकेंडमध्ये RRRची दणक्यात कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Oscars 2022: ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? तिची किंमत नेमकी किती?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें