AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscars 2022: ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? तिची किंमत नेमकी किती?

कलाविश्वातील सर्व पुरस्कार एका बाजूला आणि जगभरात प्रतिष्ठित मानला जाणारा 'ऑस्कर' (Oscars) एका बाजूला. 'अँड द ऑस्कर गोज टू...' हे पुरस्कार सोहळ्यातील शब्द ऐकण्यासाठी कलाविश्वातील अनेकांचे कान आसुसलेले असतात. सोनेरी रंगाची ऑस्करची ती बाहुली आपल्याला आयुष्यात एकदा तरी मिळावी, यासाठी कलाकार वर्षानुवर्षे प्रयत्न करत असतात. पण ही ट्रॉफी खरंच सोन्याची असते का?

Oscars 2022: ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? तिची किंमत नेमकी किती?
Oscar award trophyImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 28, 2022 | 11:01 AM
Share

कलाविश्वातील सर्व पुरस्कार एका बाजूला आणि जगभरात प्रतिष्ठित मानला जाणारा ‘ऑस्कर’ (Oscars) एका बाजूला. ‘अँड द ऑस्कर गोज टू…’ हे पुरस्कार सोहळ्यातील शब्द ऐकण्यासाठी कलाविश्वातील अनेकांचे कान आसुसलेले असतात. सोनेरी रंगाची ऑस्करची ती बाहुली आपल्याला आयुष्यात एकदा तरी मिळावी, यासाठी कलाकार वर्षानुवर्षे प्रयत्न करत असतात. पण ही ट्रॉफी खरंच सोन्याची असते का आणि सोन्याची असल्यास त्याचं मूल्य (Academy Award prize) काय असेल? ऑस्करची ही बाहुली संपूर्ण सोन्याची वाटत असली तरी ती पूर्णपणे सोन्याची नाही. 13.5 इंच उंच आणि जवळपास चार किलो वजनाची ही ट्रॉफी सर्वप्रथम कांस्यमध्ये बनवण्यात आली होती आणि त्यावर सोन्याचा मुलामा (Golden Trophy) चढवण्यात आला होता. पण आता ही ट्रॉफी धातूची बनवली जाते आणि त्यावर सोन्याचा मुलामा लावला जातो.

ऑस्करची ट्रॉफी बनवण्याचा खर्च किती?

Time Inc. ची खासगी वित्त कंपनी Coinage द्वारे निर्मित 2017च्या व्हिडिओमध्ये ऑस्करची ट्रॉफी बनवण्याची किंमत सुमारे 400 डॉलर्स असल्याचं सांगितलं आहे. पण जर का ही ट्रॉफी कोणी विकायचं ठरवलं तर? अकॅडमीच्या मते, त्याला फक्त 1 डॉलर मिळू शकेल. आश्चर्याचा धक्का बसला ना? अकॅडमीच्या नियमांमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की 1950 नंतर देण्यात आलेला कोणताही ऑस्कर हा पुरस्कार प्राप्तकर्त्यांना किंवा त्याच्या वारसांना अकॅडमीला 1 डॉलरमध्ये परत विकण्याची ऑफर दिल्याशिवाय विकता येणार नाही. विजेत्याचा ऑस्कर ट्रॉफीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. त्यामुळे तो ट्रॉफी परस्पर विकू शकत नाही. हा नियम लागू होण्याआधी म्हणजेच 1950 च्या आधी काही लोकांनी ही ट्रॉफी विकून बराच नफा कमावला होता. एका अज्ञात खरेदीदाराने 2011 मध्ये लिलावात ऑर्सन वेल्सची ‘सिटीझन केन’साठी मिळालेली सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेची ऑस्कर विकत घेतली होती. या ट्रॉफीसाठी त्याने तब्बल 861,542 डॉलर्स म्हणजेच जवळपास साडेसहा कोटी रुपये दिले होते.

अकॅडमी अवॉर्ड्सला ‘ऑस्कर’ हे नाव कसं पडलं?

1939 मध्ये अकॅडमीने त्यांच्या पुरस्कारांसाठी ‘ऑस्कर’ हे नाव निश्चित केलं. ऑस्करला आधी अधिकृतपणे अकॅडमी अवॉर्ड ऑफ मेरिट असं नाव देण्यात आलं आणि अकॅडमीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, MGM कला दिग्दर्शक सेड्रिक गिबन्स यांनी पुतळ्याचा स्केच काढण्याचं काम हाती घेतलं होतं. त्यांनी सर्वांत आधी चित्रपटाच्या रीळवर हातात तलवार घेऊन उभ्या असलेल्या बाहुलीचं चित्र काढलं होतं. 1928 मध्ये सहयोगी शिल्पकार जॉर्ज स्टॅन्ले यांनी ट्रॉफीची पुनर्रचना केली. जेव्हा अकॅडमीचे ग्रंथपाल आणि कार्यकारी संचालक मार्गारेट हेरिक यांनी ती ट्रॉफी पाहिली, तेव्हा ती त्यांना त्यांचे काका ऑस्कर यांच्यासारखी वाटली. नंतर 1934 मध्ये अमेरिकन लेखक सिडनी स्लोलस्की यांनी त्यांच्या हॉलिवूड स्तंभात कॅथरिन हेपबर्नच्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या विजयाचं वर्णन करण्यासाठी हे नाव वापरलं. यामुळे ऑस्कर हे नाव लोकप्रिय झालं आणि 1939 मध्ये ते अकॅडमीने ते नाव स्वीकारलं.

हेही वाचा:

Oscar 2022: भडकलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली; उपस्थितांना बसला आश्चर्याचा धक्का!

Oscars 2022 complete winners list: ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलेल्यांची संपूर्ण यादी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.