The Kapil Sharma Show : ‘या’ कारणामुळे कपिल शर्मावर रागवला सैफ आली खान, शक्ती कपूरशी होते नाराजीचे कनेक्शन!

कपिल शर्मा शो (Kapil Sharma Show) प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपल्या प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. दर आठवड्याला काही सेलिब्रिटीज या शोमध्ये येतात, ज्यांच्यासोबत कपिल शर्मा खूप धमाल करतो.

The Kapil Sharma Show : ‘या’ कारणामुळे कपिल शर्मावर रागवला सैफ आली खान, शक्ती कपूरशी होते नाराजीचे कनेक्शन!
Kapil-Saif


मुंबई : कपिल शर्मा शो (Kapil Sharma Show) प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपल्या प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. दर आठवड्याला काही सेलिब्रिटीज या शोमध्ये येतात, ज्यांच्यासोबत कपिल शर्मा खूप धमाल करतो. अलीकडेच सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम त्यांच्या आगामी ‘भूत पोलिस‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आले होते.

‘भूत पोलिस’च्या प्रमोशनसाठी आलेल्या सैफ अली खानने यावेळी कपिल शर्मावर नाराजी व्यक्त केली. कपिल शर्माने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सैफ अली खान कपिल शर्माला सांगत आहे की, तो त्याच्यावर रागावला आहे.

का आला सैफला कपिलचा राग?

या व्हिडीओमध्ये सैफ, यामी आणि जॅकलिन ग्रीन रूममध्ये उभे असलेले दिसत आहेत. सैफ विचारतो कपिल कुठे आहे, तो अजून का आला नाही. तोपर्यंत कपिल शर्मा ग्रीन रूममध्ये येतो आणि तिन्ही सेलेब्स नमस्कार करतो. सैफ कपिलला सांगतो की, मी या सेटच्या डिझायनरवर खूप नाराज आहे. मी तुमच्यासोबत दहा शो केले आहेत. तरीही माझा एकही फोटो इथे नाही. त्यानंतर, शक्ती कपूरच्या फोटोकडे बोट दाखवताना तो म्हणातो की, इथे या साहेबांचा देखील फोटो आहे. सैफची ही चर्चा ऐकून तिथे उभे असलेले सगळे लोक जोरजोरात हसायला लागतात.

पाहा व्हिडीओ :

सैफ पुन्हा रागवला

व्हिडी\ओच्या दुसऱ्या भागातही सैफ आपली नाराजी व्यक्त करतो. तो म्हणतो की, या ग्रीन रूममध्ये माझा एकही फोटो नाही. पण यावेळी त्याने शोचे मात्र कौतुक केले. तो म्हणतो की, मी या शोमध्ये 10 वेळा आलो आहे पण आतापर्यंत माझा फोटो ग्रीन रूममध्ये नाही, याचे मला वाईट वाटते आहे.

ब्रेक नंतर पुनरागमन

कपिल शर्मा, दीर्घ ब्रेक घेतल्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनसह पडद्यावर परतला आहे. अजय देवगण या शोच्या पहिल्या भागात आला होता. आतापर्यंत अक्षय कुमार, रणधीर कपूर, करिश्मा कपूर, उदित नारायण यांच्यासह अनेक सेलेब्स कपिल शर्माच्या या शोमध्ये आले आहेत. शोच्या आगामी भागात विकी कौशल त्याचा आगामी ‘सरदार उधम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. या शोमध्ये विकीसोबत शूजित सरकारही येणार आहे.

शोसाठी घेतोय तगडे मानधन

न्यूज 18च्या एका अहवालानुसार, कपिल आता एका आठवड्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये घेणार आहे. पूर्वी कपिल प्रत्येक एपिसोड साठी 30 लाख रुपये मानधन आकारत असे आणि आता प्रत्येक एपिसोडमागे 50 ते 70 लाखांची वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, पूर्वी कपिल आठवड्याला 60 लाख रुपये घेत होता, मात्र आता तो 1 कोटी रुपये घेईल.

तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. याविषयी कपिल किंवा शोच्या निर्मात्यांनीही कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्याचबरोबर बातमी अशीही आहे की, कपिलचे बाकीचे साथीदार कॉमेडियनसुद्धा चांगली तगडी रक्कम घेणार आहेत.

हेही वाचा :

Video | पत्नी दिसताच रोमँटिक झाला पुनीत पाठक, खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!

Bigg Boss 15 | ‘माझी आई-बहिण बाथरूममध्ये असती तर…’, प्रतिक सहजपालच्या ‘त्या’ कृत्यावर भडकला सलमान खान!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI