Binge Watch : रोमँटिक-विनोदी चित्रपट पाहून कंटाळलायत? मग, ओटीटीवर या 5 फॅन्टसी सीरीज नक्की पाहा!

| Updated on: Jul 18, 2021 | 11:28 AM

कोरोना व्हायरसच्या या काळात जर आपण सतत रोमँटिक, विनोदी आणि गुन्हेगारी चित्रपट आणि सीरीज पाहून कंटाळला असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा पाच सीरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या लॉकडाऊनमध्ये तुमचे खूप मनोरंजन करू शकतील.

Binge Watch : रोमँटिक-विनोदी चित्रपट पाहून कंटाळलायत? मग, ओटीटीवर या 5 फॅन्टसी सीरीज नक्की पाहा!
OTT
Follow us on

मुंबई : मानवी मन बहुधा कल्पनेने वेढलेले असते. चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्याकडे बर्‍याचदा काल्पनिक जग दाखवले जाते, जे आपल्याला मनोरंजक वाटते. कोरोना व्हायरसच्या या काळात जर आपण सतत रोमँटिक, विनोदी आणि गुन्हेगारी चित्रपट आणि सीरीज पाहून कंटाळला असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा पाच सीरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या लॉकडाऊनमध्ये तुमचे खूप मनोरंजन करू शकतील. या सीरीज आपल्याला एका कल्पनारम्य जगात घेऊन जातील, ज्यामुळे सततच कंटाळा देखील कमी होईल.

  1. Shadow and Bone

‘शॅडो अँड बोन’ ही सीरीज याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. भव्य अभिनयापासून सिनेमॅटोग्राफीपर्यंत ही सीरीज जबरदस्त आहे. ही एका अनाथ आणि रहस्यमय शक्ती असलेल्या अलिना स्टारकोव्ह नावाच्या मुलीची कथा आहे. यात अलिनाचा युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या देशात ती कशी पोहोचते हा प्रवास दाखवला आहे. ‘शॅडो अँड बोन’मध्ये जेसी मेई ली, आर्ची रेनॉक्स, अमिता सुमन, बेन बार्न्स, फ्रेडी कार्टर आणि किट यंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  1. Doctor Who

ही एक ब्रिटीश सीरीज आहे, जी टाईम ट्रॅव्हलवर आधारित आहे. ही एक विज्ञान कल्पित सीरीज आहे. यात ‘डॉक्टर’ नावाच्या टाईम लॉर्डचे कारनामे दाखवले गेले आहेत, जो एक वेगळा प्राणी आहे, परंतु तो मनुष्यासारखा दिसत आहे. या सीरीजमध्ये  आपल्याला बर्‍यापैकी अॅक्शन पहायला मिळेल आणि कदाचित आपणास हे कल्पनारम्य जग आवडेल. आपण ही मालिका Amazon प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

  1. October Faction

यात आपण सरकारी संस्था, गडद कौटुंबिक रहस्ये, हेरगिरी, भुते आणि व्हॅम्पायर्स यासारख्या गोष्टी पाहू शकता. ही अशा एका कुटूंबाची कहाणी आहे, ज्यांचा भुते पकडण्याचा व्यवसाय आहे. या दरम्यान, त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या हा थरारक प्रवास आपण घरबसल्या पाहू शकता. ही सीरीज त्याच नावाच्या ग्राफिक कादंबरीवर आधारित आहे. ही सीरीज आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  1. Game Of Thrones

ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका जॉर्ज आरआर मार्टिनने विकल्या गेलेल्या पुस्तक सीरीजवर आधारित आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही जगातील सर्वात आवडती मालिका आहे. हा एक अमेरिकन फॅन्टसी ड्रामा आहे. या वेब सीरीजमध्ये आपल्याला पॉलिटिकल ड्रामा, अॅक्शन, आईस झोम्बीज आणि ड्रॅगन यासारख्या गोष्टी पहायला मिळू शकतात. आपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरीज पाहू शकता.

  1. His Dark Materials

ही सीरीज ब्रह्मांड आणि राक्षसांमधील लढाई, तसेच चांगले आणि क्रिप्टो-फॅसिझम यावर आधारित आहे. यात क्रिया लायरा नावाची एक अल्पवयीन मुलगी आपल्या हरवलेल्या मित्राच्या शोधात निघाली आहे. यादरम्यान, ती सरकारी गुपितांमध्ये अडकून पडली आहे. या सीरीजची कथा बरीच रंजक आहे. आपण ही सीरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

(Tired of watching romantic comedy movies Then check out these 5 fantasy series on OTT)

हेही वाचा :

The Flush : ‘फिल्म पैसों से नहीं, दिल से बनती है’, अमरावतीच्या तरुणाचा झिरो बजेट लघुपट

Samantar 2 | ‘समांतर 2’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद, अवघ्या 15 दिवसांत 56 दशलक्षहूनही अधिक व्ह्यूज!