The Flush : ‘फिल्म पैसों से नहीं, दिल से बनती है’, अमरावतीच्या तरुणाचा झिरो बजेट लघुपट

25 मिनिटांचा हा लघुपट अगदी झिरो बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. एवढंच नाही तर पियुषनं बनवलेला हा लघुपट MX Player या नावजलेल्या OTT platform वर प्रदर्शितही झालाय. ('The Flush' a Zero Budget Short Film made by Amravati's Piyush Vijay, Streaming on MX Player )

The Flush : 'फिल्म पैसों से नहीं, दिल से बनती है', अमरावतीच्या तरुणाचा झिरो बजेट लघुपट
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 3:03 PM

मुंबई : असं म्हटलं जातं की ‘फ़िल्म पैसों से नहीं, दिल से बनती है !’ आणि हे वाक्य अमरावती (Amravati) जिल्ह्यात असलेल्या वरुड (Warud) तालुक्यातील पियुष विजय (Piyush Vijay) या तरुणानं खरं करुन दाखवलंय. त्यानं एक लघुपट (Short Film) तयार केला आहे ज्याच नाव आहे ‘The Flush‘. महत्त्वाचं म्हणजे 25 मिनिटांचा हा लघुपट अगदी झिरो बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. एवढंच नाही तर पियुषनं बनवलेला हा लघुपट MX Player या नावजलेल्या OTT platform वर प्रदर्शितही झालाय.

झिरो बजेटमध्ये लघुपट कसा तयार केला?

कोणत्याही चित्रपट जाणकाराला हा लघुपट दाखवून त्याला लघुपटाची मेकिंग कॉस्ट काढायला सांगितली तर तो काही हजारांचा आकडा नक्की सांगेल.सलग 25 मिनिटं प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा भयपट राम नावाच्या लेखका भोवती फिरतो. रामचा जन्म हनुमान जयंतीला झाला असल्यानं नियती त्याला एका घरात पाठवते जिथं काही गोष्टींचा संचार असतो आणि नंतर खेळ सुरु होतो त्या आत्म्याला शांती देण्याचा. या लघुपटात एका रहस्याचा उलगडा करण्यात आला आहे आणि हे रहस्य उलगडण्याची पद्धतही बघण्यासारखी आहे.उंदीराचा अर्भक, हॉरर व्ही.एफ.एक्स.,जंगलतील दृश्ये, वाजणारा बंद फोन, माळकरी दूधवाला आणि सतत होणारा फ्लशचा आवाज या सर्व गोष्टींभवती या लघुपटाची कहानी फिरते. आता प्रश्न येतो की पियुषने अशा आशयाचा लघुपट झिरो बजेटमध्ये बनवला कसा?.

‘झिरो बजेट शेती’ या संकल्पनेतून मिळाली प्रेरणा

सध्या ‘झिरो बजेट शेती’ ही कल्पना शेतकरी राबवतांना दिसतात, मग आपण ‘झिरो बजेट फिल्म मेकिंग’चा प्रयोग करू शकतो का? हा विचार पियुषच्या मनात आला. सिनेमातील कलात्मकतेला तांत्रिकबाजू असते आणि बरंच बजेट या तांत्रिक गोष्टीवर खर्च होतं. या तांत्रिक गोष्टी म्हणजे छायाचित्रण यंत्रणा, प्रकश यंत्रणा, ध्वनीमुद्रण, संकलन, संगणक दृश निर्माण (व्ही.एफ.एक्स.), पार्श्वसंगीत, ध्वनी मिश्रण, रंगदुरुस्ती इत्यादी. या सर्व गोष्टींना खर्च लागतोच. हा खर्च कसा टाळता येऊ शकतो यावर पियुषनं लक्ष केंद्रित केलं. अशातच मागच्या वर्षी कोरोनामुळे पहिलं लॉकडाऊन लागलं आणि सगळी काम ठप्प झाली. पियुष मुंबईवरुन गावी पोहोचला. या लॉकडाऊनमध्ये पियुष ला ‘झिरो बजेट फिल्म मेकिंग’ प्रयोगाची कल्पना सत्यात उतरवण्याची संधी मिळाली.

लॉकडाऊनमध्ये तयार केला लघुपट

लॉकडाऊनमध्ये पियुषनं अशी स्क्रिप्ट लिहिली जी एका लोकेशनमध्ये पूर्ण होईल आणि शूटिंग दरम्यान लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही. लघुपटात सर्व कलाकार वरुडचे आहेत, त्यांची अभिनय कार्यशाळा पियुषने घेतली. वरुडमधील कलाकार डॉ.अरविंद बडघरे, प्राध्यापक अश्वपाल वानखडे, यशश्री काशीकर, वैभव लिखितकर यांनी या लघुपटामध्ये उत्तम काम केलं. डॉ.विजय देशमुख यांनी त्यांचा फार्म हाउस शूटिंगसाठी उपलब्ध करून दिला आणि लघुपटाचे प्री-प्रोडक्शन पूर्ण झालं. आता शूटिंगसाठी गरज होती तांत्रिकबाजू उत्तमप्रकारे सांभाळणाऱ्या लोकांची. वरुडमधील वेडिंग फोटोग्राफर बाला राऊत यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली. सचिन परिहार आणि अनुराग यावलकर यांनी ध्वनीमुद्रणाची जबाबदारी स्विकारली.

छोट्या मोठ्या अडचणींचा सामना करत केली निर्मिती

लघुपटात लागणारे नेपथ्य बाजारपेठा बंद असल्यामुळे विकत घेण्याची सोय नव्हती आणि झिरो बजेट फिल्म मेकिंगचा प्रयोग असल्यामुळे आहे त्या वस्तू वापरुन काम करण्याचं आव्हान पुढे होते. शूटिंगच्या दरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागले,शूटिंग शेतात असल्यामुळे विद्युत पुरवठा मध्येच खंडित व्हायचा, शेतातील उंदिरांनी नेपथ्य साधनांचं नुकसान केलं होतं अश्याप्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या अडचणींचा सामना लघुपटाच्या संपूर्ण टीमने केला आणि लघुपटाचे चित्रिकरण चिकाटीनं आणि हिमतीनं पूर्ण केलं.

पियुषचा ‘झिरो बजेट फिल्म मेकिंग’चा प्रयोग सर्वांनी मिळून सत्यात उतरवला . या लघुपटातून वरुडमधील कलाकारांनी दाखवून दिलं की उपलब्ध साधनात एक चांगली कलाकृती कोणीही कुठेही करू शकतो आणि ती नावजलेल्या OTT चॅनलवर रिलीजही करू शकतो, त्यासाठी नेहमी मुंबईला किंवा मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. आता या लघुपटातून जो काही नफा येईल त्याचा काही भाग सामजिक कामासाठी वापरण्याचा मानस या कलाकारांचा आहे. तुम्ही हा लघुपट MX player वर अगदी मोफत बघू शकता.

संबंधित बातम्या

Kareena Kapoor | ‘तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’, ‘परफेक्ट’ आई होण्याबद्दल सांगताना करीना कपूर म्हणते…

‘भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का?’ अजाणावर भाष्य करणाऱ्या ‘भोंगा’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.