Kareena Kapoor | ‘तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’, ‘परफेक्ट’ आई होण्याबद्दल सांगताना करीना कपूर म्हणते…

अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) सध्या तिच्या ‘प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकासाठी बरीच चर्चेत आली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून करीनाने आपला प्रेग्नन्सी अनुभव शेअर केला आहे.

Kareena Kapoor | ‘तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’, ‘परफेक्ट’ आई होण्याबद्दल सांगताना करीना कपूर म्हणते...
करीना कपूर आणि कुटुंब

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) सध्या तिच्या ‘प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकासाठी बरीच चर्चेत आली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून करीनाने आपला प्रेग्नन्सी अनुभव शेअर केला आहे आणि याखेरीज अनेक खुलासेही केले आहेत. सुरुवातीला ती ‘परफेक्ट’ आई नव्हती, असे करीनाने पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितले आहे.

करीनाला बाळाबद्दल असलेली कोणतीही जबाबदारी पार पाडताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असे. करीनाने पुस्तकात लिहिले आहे की, ‘सुरुवातीला मी परिपूर्ण आई नव्हती. तैमूरला डायपर कसे घालायचे हे देखील मला माहित नव्हते. बर्‍याच वेळा तो सुसु करायचा, आणि सगळं ओलं व्हायचं, कारण डायपर व्यवस्थित घातलेले नसायचे.

करीनाने पुढे सर्वांना सल्ला दिला आणि म्हणाली की, ‘तुमच्यासाठी जे सोपे आहे ते तुम्ही करावे. तरच, तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकाल. जेव्हा आई आत्मविश्वासू व आरामात असते, तेव्हा बाळही तसेच असते. यामुळेच मला लवकरच कामावर परत यावं लागलं.’

केवळ ‘आई’ही ओळख नाही!

करीना म्हणाली की, तिला माहित आहे की फक्त आई असणे ही तिची ओळख नाही आणि म्हणूनच तिने तिच्या गरोदरपणात देखील काम केले आणि मुलाच्या जन्मानंतर लगेच कामावर परत आली. बाळाला घरी सोडणे आणि कामावर जाणे तिच्यासाठी देखील सोपे नव्हते.

आपला अनुभव सांगताना करीना म्हणाली, ‘मला तैमूर सोडून रात्रीच्या शूटवर गेल्याचे आठवते. त्यावेळी मला माझ्या मुलाची खूप आठवण येत होती, परंतु मला त्यावेळी व्यावसायिक रहावे लागले. जेहचा जन्म झाल्यावर मी पुन्हा कामावर परतले. माझ्यावर विश्वास ठेवा, मी लवकर कामावर परतलो म्हणून तैमूर किंवा जेह माझ्यावर कमी प्रेम करतील असे नाही. मी एक आई आहे आणि मी काम करून रॉक देखील करणार आहे.’

करीनाचे व्यावसायिक आयुष्य

करीना अखेर ‘अंग्रेज़ी मीडियम या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीनाबरोबर इमरान खान आणि राधिका मदन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील करीनाची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती.

आता करीना ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये आमिर खान तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. करीनाने गरोदरपणात हा सिनेमा शूट केला होता. त्यावेळी करीनाचा बेबी बंप दिसत होता. तथापि, निर्मात्यांनी पुन्हा निर्णय घेतला होता की, ते व्हीएफएक्सद्वारे करिनाच्या बेबी बंप लपवतील.

(Kareena Kapoor Khan Share Perfect mother experience in her book)

हेही वाचा :

‘भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का?’ अजाणावर भाष्य करणाऱ्या ‘भोंगा’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस!

Bhushan Kumar Rape Case | T-Seriesचे मालक भूषण कुमारवर बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांनी दाखल केला FIR

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI