
नव्वदच्या दशकातील अभिनेत्री आजही तेवढ्याच प्रसिद्ध, लोकप्रिय आहेत. आजही त्या अभिनेत्रींसाठी चाहते वेडे आहेत. माधुरी दिक्षीत, राणी मुखर्जीपासू ते काजोल, जुही चावला, करिश्मा ते अगदी सोनाली बेंद्रेपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी 90 चा काळ गाजवला आहे. त्यांचे चित्रपट, गाणी अजाही तेवढीच लोकप्रिय आहेत. तर अनेक अभिनेत्री शिक्षणात हुशार होत्या, त्यांचं फिल्डही वेगळं होतं पण तरीही त्यांनी अभिनय निवडला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे.
सोनाली बेंद्रेने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली
मराठमोळी मुलगी असणाऱ्या सोनाली बेंद्रेने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या हास्याने पहिली छाप सोडणारी अशी सोनाली बेंद्रे. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबातून आलेल्या सोनालीने कायमच सिनेमांत काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. सोनालीला अभिनयातच करिअर करायचं होतं. त्यासाठी तिने वडिलांकडून तीन वर्ष मागितली होती. ती वडिलांना म्हणाली होती, “मला फक्त 3 वर्षे द्या. नाहीतर मी माझं शिक्षण पूर्ण करून IAS ची तयारी करेन.” तिने ती 3 वर्ष स्वत:ला दिली आणि खरंच तिनं ते सिद्ध केलं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वत:ला झोकून दिलं. इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना सोनालीनं तिच्या कष्टाने स्व:बळावर नाव कमावलं.
पहिल्यांदा Bombay सिनेमातील सोनालीचं ‘हम्मा हम्मा’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
1995 मध्ये आलेल्या मणिरत्नमच्या Bombay सिनेमातील सोनालीचं ‘हम्मा हम्मा’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. ए आर रहमानच्या या गाण्याने सोनालीच्या करिअरला एक वेगळी दिशा दिली. त्या गाण्यात सोनालीने केलेल्या डान्सने तिला खूप प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले. हे गाणं तिच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.
सोनालीच्या आईने दिली होती ताकिद
‘हम्मा हम्मा’ गाणं हिट झाल्यानंतर सोनाली 1996 मध्ये आलेल्या ‘दिल जले’ सिनेमात अजय देवगणबरोबर दिसली. सिनेमातील सोनालीचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. तिचं हास्य, तिची एनर्जी, लूक आणि गाणी खूप लोकप्रिय झाली. त्यावेळी तिच्या घरच्यांनी देखील तिला साथ दिली. पण याचवेळी तिच्या आईने तिला एक ताकिदही दिली होती जे आजही सोनालीच्या लक्षात आहे. सोनालीची आई तिला म्हणाली होती की, “आमची इज्जत तुझ्या हातात आहे.”
“आमची इज्जत आता तुझ्या हातात आहे.”
सोनाली हा प्रसंग सांगताना म्हणाली होती, “माझ्या आईने नेहमी मला फ्रिडम दिलं. ती कधीच सेटवर आली नाही. ती म्हणायची जर तू ऑफिसला गेलीस तर मी तुझ्या शेजारी येऊन बसेन का?’ त्यामुळे मी तुझ्या सेटवरही येणार नाही. ती फक्त मला नेहमी एवढंच सांगायची की आमची इज्जत आता तुझ्या हातात आहे. आई-वडिलांच्या विश्वासामुळे मला अधिक जबाबदार बनवलं. ते आजपर्यंत माझ्या कामात आणि आयुष्यात दिसत आहे.”