श्रद्धा कपूरच्या कुटुंबातील लोकप्रिय अभिनेत्री दिसणार सलमान खानच्या शोमध्ये? मोठी अपडेट समोर

Salman Khan: श्रद्धा कपूरच्या कुटुंबातील 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीची सलमान खान याच्या शोमध्ये होणार एन्ट्री? मोठी अपडेट अखेर समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या आगामी शोची चर्चा...

श्रद्धा कपूरच्या कुटुंबातील लोकप्रिय अभिनेत्री दिसणार सलमान खानच्या शोमध्ये? मोठी अपडेट समोर
| Updated on: Sep 22, 2024 | 12:59 PM

अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेषतः ‘बिग बॉस’ शोमध्ये अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहते अधिक उत्सुक असतात. आता सलमान खान लवकरच ‘बिग बॉस 18’ च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. यावर्षी बिग बॉस सीझन 18 ऑक्टोबरमध्ये प्रीमियर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शोच्या प्रीमियरची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची चर्चाही रंगत आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत निया शर्मा, धीरज धूपर आणि शोएब इब्राहिम या कलाकारांची नावे स्पर्धक म्हणून समोर आली आहेत.

एवढंच नाही तर, आता शोमधील काही जुने स्पर्धक देखील यंदाच्या पर्वात सहभागी होऊ शकतात. आता अशा एका स्पर्धकाचं नाव समोर येत आहे, जो अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या फार जवळचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोचे निर्माते सध्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी या शोचा भाग होण्यासाठी चर्चा करत आहेत. पद्मिनी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पद्मिनीही श्रद्धा कपूरची मावशी आहे.

 

 

सांगायचं झालं तर, पद्मिनी कोल्हापुरी यांनी आतापर्यंत कोणत्यात रिऍलिटी शोमध्ये स्वतःचा सहभाग नोंदवला नाही. जर त्या बिग बॉस शोमध्ये आल्या, तर स्पर्धक म्हणून पद्मिनी कोल्हापुरी यांना पाहाणं चाहत्यांसाठी आनंददायी बाब असेल.

सूत्रानुसार, पद्मिनी यांनी शोचा भाग बनवण्यासाठी निर्माते खूप उत्सुक आहेत आणि त्याच्या तयारीवर काम करत आहेत. पद्मिनी कोल्हापुरी यांच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, 1974 मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

पद्मिनी कोल्हापुरी यांनी बॉलिवूड, मराठी आणि मल्याळम इंडस्ट्रीतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘वो सात दिन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘विधाता’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये पद्मिनी कोल्हापुरी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पद्मिनी कोल्हापुरी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us