AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकअप, प्रेमात फसवणूक नाही, ‘या’ कारणामुळे सलमान खान आजही अविवाहित

Salman Khan Marriage: 'या' एका कारणामुळे सलमान खान नाही अडकला विवाहबंधनात... अनेक अभिनेत्रींसोबत भाईजान रिलेशनशिपमध्ये होता पण... अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

ब्रेकअप, प्रेमात फसवणूक नाही, 'या' कारणामुळे सलमान खान आजही अविवाहित
| Updated on: Sep 22, 2024 | 11:58 AM
Share

अभिनेता सलमान खान अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सलमान खान फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, इतर गोष्टींमुळे देखील कायम चर्चेत असते. सांगायचं झालं तर, अनेक ठिकाणी सलमान खान याला चाहत्यासोबत आदराने व्यवहार करताना स्पॉट करण्यात आलं आहे. भाईजान आई – वडिलांचा देखील आदर करतो. सलमान खान पूर्णपणे फॅमेली मॅन आहे. असं असताना देखील सलमान खान आजही सिंगल आहे. वयाच्या 58 व्या वर्षी देखील भाईजान अविवाहित आहे.

सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणासोबत अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण ब्रेकअप, प्रेमात फसवणूक या कारणांमुळे सलमान खान अविवाहित नसून एका मोठ्या काणरणामुळे सलमानने लग्न केलं नाही… अशी चर्चा रंगली आहे.

सलमान खानचा भाऊ अरबाज खान याच्या शोमध्ये वडील सलीम खान यांनी मोठा खुलासा केला होता. अरबाज खान म्हणाला, ‘खान कुटुंबाबद्दल अनेकांना असं वाटतं की प्रत्येक जण गॅलक्सीमध्ये राहतो. पण तुम्ही फार पूर्वी सांगितलं होतं, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या घरात राहू शकता. पण जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हा तुम्ही वेगळं राहायचं. तुम्ही दिवसभर घरी राहा काही हरकत नाही… दूर राहिल्यामुळे प्रेम वाढतं… असं देखील तुम्ही आम्हाला म्हणाले होते…’

यावर सलीम खान म्हणाले, ‘दूर राहिल्यामुळे प्रेम वाढतं… एक दिवस जरी कोणी आलं नाही तरी, कुठे आहे? आज का नाही आले घरी? आज फोन का नाही आला?’ सलीम खान यांनी दिलेला सल्ला अरबाज खान आणि सोहैल खान यांनी ऐकला. लग्नानंतर अरबाज, सोहैल त्यांच्या कुटुंबासोबत वेगळे निघाले. पण सलमान खान आजही आई – वडिलांसोबत राहतो.

सलमान खान त्याच्या आई – वडिलांसोबत गॅलक्सी अपार्टमेंट राहतो. सलीम खान आणि सलमान एका अपार्टमेंटमध्ये राहात असले तरी, वेगळ्या घरात राहतात. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते म्हणाले, ‘आई – वडिलांवर प्रचंड प्रेम करत असल्यामुळे सलमानने लग्न केलं नाही.’ सध्या सर्वत्र सलीम खान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यासोबत सलमान खान यांचं लग्न ठरलं होतं. पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात ऐश्वर्या राय हिची एन्ट्री झाली. पण दोघांतं नातं देखील फार काळ टिकलं नाही. त्यानंतर भाईजानचं नाव कतरिना कैफ हिच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.