भारताच्या देशभक्तीपर गाण्यावर पाकिस्तानचा झेंडा; पाकिस्तानी अभिनेत्रींचा व्हिडीओ व्हायरल, झाल्या ट्रोल

पाकिस्तानी अभिनेत्री एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री भारतीय देशभक्ती गाण्यावर झुमताना दिसत आहे. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

भारताच्या देशभक्तीपर गाण्यावर पाकिस्तानचा झेंडा; पाकिस्तानी अभिनेत्रींचा व्हिडीओ व्हायरल, झाल्या ट्रोल
| Updated on: Aug 17, 2026 | 3:16 PM

पाकिस्तानमध्ये दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी ‘यौम-ए-आझादी’ अर्थात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पाकिस्तानी नागरिकांसोबतच तेथील कलाकार आणि सेलिब्रिटीही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसतात. मात्र यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनमध्ये काही पाकिस्तानी अभिनेत्रींनी केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाच पाकिस्तानी अभिनेत्री हातात पाकिस्तानचा झेंडा घेऊन आनंदाने सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या हसताना आणि झूमताना दिसतात. मात्र विशेष म्हणजे त्यांच्या या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकप्रिय देशभक्तीपर गाणं वाजताना ऐकू येत आहे.

आलिया भट्टच्या ‘राजी’ या चित्रपटातील ‘ऐ वतन… वतन मेरे… आबाद रहे तू…’ हे गाणं या व्हिडीओमध्ये वापरण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन भारतीय देशभक्तीपर गाण्यावर स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या या अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. ‘राजी’ हा चित्रपट भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याने या गाण्याची निवड आणखी चर्चेचा विषय ठरली आहे.

अभिनेत्रींच्या व्हिडीओवर नाराजी

या प्रकारावर एका पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरनेही नाराजी व्यक्त केली. ड्रॅज वारिसने हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रींच्या गाण्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला. त्या प्रसिद्ध आणि अनुभवी अभिनेत्री असल्याने त्यांनी अशा प्रकारची पोस्ट किंवा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी अधिक काळजी घ्यायला हवी होती असं त्याने म्हटलं.

इन्फ्लुएन्सरने म्हटलं की, हे गाणं ज्या चित्रपटातील आहे, त्याची पार्श्वभूमी पाकिस्तानविरोधी असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनसाठी त्याची निवड करणं योग्य वाटत नाही. अशा प्रकारामुळे पाकिस्तानची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाऊ शकते, अशीही त्याने नाराजी व्यक्त केली.

व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया

त्याचबरोबर हा मुद्दा भारतीय संगीत किंवा बॉलिवूडच्या विरोधात नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. मात्र प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांना आणि स्वातंत्र्यदिनासारख्या महत्त्वाच्या प्रसंगांना एक वेगळं महत्त्व असतं, त्यामुळे अशा वेळी गाण्याची निवड करताना कलाकारांनी अधिक संवेदनशील राहण्याची गरज असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण अभिनेत्रींच्या गाण्याच्या निवडीवर टीका करत आहेत तर काही जण हा प्रकार केवळ गाण्याच्या निवडीतील चूक असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्रींच्या या स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us