Sania Mirza | शोएब मलिकने इन्स्टाग्रामवर उचललं ‘हे’ पाऊल; पुन्हा एकदा सानियाला घटस्फोट देण्याच्या चर्चा

शोएब आणि सानिया हे कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याचंही म्हटलं जातं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचीही चर्चा होती. पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरचं शोएबशी नाव जोडलं गेलं होतं.

Sania Mirza | शोएब मलिकने इन्स्टाग्रामवर उचललं हे पाऊल; पुन्हा एकदा सानियाला घटस्फोट देण्याच्या चर्चा
Shoaib Malik and Sania Mirza
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2023 | 8:18 AM

लाहौर | 4 ऑगस्ट 2023 : टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेकदा झाल्या. मात्र या चर्चा केवळ अफवा असल्याचं समजलं होतं. पण आता पुन्हा एकदा या जोडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची माहिती समोर येत आहे. याआधी जेव्हा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं, तेव्हा सानिया किंवा शोएबने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याऐवजी दोघांनी मिळून ‘द मिर्झा मलिक शो’ होस्ट केला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा होत आहे. यामागील कारण म्हणजे शोएबचा इन्स्टाग्राम बायो. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून पत्नी सानिया मिर्झाचं नाव हटवलं आहे.

‘एक सुपरवुमन सानिया मिर्झाचा पती’, असा त्याचा आधीचा बायो होता. आता त्याने हे नाव हटवल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सानिया आणि शोएब खरंच विभक्त होत आहेत, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. शोएब आणि सानियाने 2010 मध्ये लग्न केलं होतं आणि तेव्हापासून ते दुबईमध्ये राहत आहेत. सानियाने 2018 मध्ये मुलगा इझानला जन्म दिला.

शोएब आणि सानिया हे कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याचंही म्हटलं जातं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचीही चर्चा होती. पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरचं शोएबशी नाव जोडलं गेलं होतं. त्यावर आयेशानेही प्रतिक्रिया दिली होती. आयेशाने शोएब मलिकच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शोएबसोबतच्या तिच्या कथित अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “मी कधीच कोणत्याही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. प्रत्येकजण मला ओळखतो आणि हे मी न सांगता सर्वांना माहीत आहे.”

आयेशा आणि शोएबने एक फोटोशूट केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आयेशाने सांगितलं होतं की शोएबसोबत तिने एक वर्षापूर्वी ते फोटोशूट केलं होतं. मात्र कॉन्ट्रोव्हर्सी पाहून माध्यमांनी त्या फोटोंचा वापर चुकीच्या पद्धतीने केला. “शोएबसोबत मी एक प्रोफेशनल फोटोशूट केलं होतं. जर एखाद्याचं अफेअर असेल तर तो अशा पद्धतीचं फोटोशूट करून त्याला सोशल मीडियावर का पोस्ट करेल? मी कधीही कोणत्याही विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही”, असं तिने स्पष्ट केलं होतं.