अभिनेत्रींसोबत एन्जॉय करतो आणि…, अभिनेत्रींना पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात आणि…

Love Life: अभिनेत्रींसोबत एन्जॉय करतो आणि..., बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचं नाव, दुसऱ्या अभिनेत्रीचं नाव जाणून व्हाल हैराण..., फार कमी लोकांना माहितेय सत्य

अभिनेत्रींसोबत एन्जॉय करतो आणि..., अभिनेत्रींना पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात आणि...
फाईल फोटो
| Updated on: Aug 23, 2025 | 1:18 PM

Love Life: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचं बॉलिवूडसोबत फार जुनं नातं आहे. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचा किंग खान, इमरान खान यांचा फार मोठा चाहता होता. एवढंच नाही तर, देव आनंद यांनी देखील इमरान खान यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. इमरान खान खान यांची लोकप्रियता एवढी होती की, बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री देखील त्यांच्यावर फिदा होत्या. अनेक अभिनेत्रींसोबत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचं नाव देखील जोडण्यात आलं… तर त्या अभिनेत्री कोणत्या होत्या जाणून घेऊ…

इमरान खान हे रेखासाठी परफेक्ट पार्टनर – अभिनेत्रीची आई

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एकमेकांना पसंत करत होते. रिपोर्टनुसार, रेखा यांना इमरान खान यांच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. 1985 मध्ये इमरान खान यांनी रेखा यांच्यासोबत मुंबईत मोठा काळ घालवला देखील. अनेकदा दोघांना नाईट क्लबमध्ये देखील स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं होतं.

रेखा यांच्या आईने देखील एका मुलाखतीत दोघांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं होतं. रेखा यांच्यासाठी इमरान खान यांच्यापेक्षा जास्त चांगला पार्टनर कोणी असूच शकत नाही… असं खुद्द रेखा यांच्या आई म्हणाल्या होत्या. पण रेखा आणि इमरान यांचंन नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत इमरान खान यांनी धक्कादायक वक्तव्य केलं होतं. रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर इमरान खान म्हणाले, ‘मला अभिनेत्रींसोबत वेळ व्यतीत करायला प्रचंड आवडतं, पण काही ठराविक वेळेपर्यंत… मी अभिनेत्रींसोबत काही काळ राहू शकतो… त्यांच्यासोबत एन्जॉय करतो आणि पुढे जातो… मला अभिनेत्रींसोबत लग्न करायचं नाही…’ इमरान खान यांच्या या वक्तव्यामुळे रेखा आणि इमरान यांचं नातं संपलं…

इमरान खान यांचं नातं फक्त रेखा यांच्यासोबत नाही तर, बॉलिवूड अभिनेत्री झिनत अमान यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. रिपोर्टनुसार, 1979 मध्ये इमरान खान यांनी स्वतःचा वाढदिवस क्रिकेट स्टेडियमच्या ड्रेसिंग रुममध्ये साजरा केलेला तेव्हा झिनत आणि इमरान खान एकत्र होते. पण दोघांनी देखील कधीन त्यांच्या नात्याची स्वीकार सर्वांसमोर केला नाही..