युद्धा दरम्यान पाकिस्तानी सैनिकांची अजब मागणी, ‘आम्हला माधुरी, रवीना द्या…’, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणालेले…
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रवीना टंडन यांची मागणी केलेली. याबद्दल खुद्द संतापलेल्या कॅप्टनने दिलेलं सडेतोड उत्तर...

90 च्या दशकातील काळ असा काळ होता जेव्हा अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अशाच अभिनेत्रींपैकी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित आणि रावीना टंडन… आता दोघे रुपेरी पडद्यापासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील मोठी होती. पाकिस्तानी सैनीक देखील माधुरी आणि रवीना यांचे चाहते होतं. एकदा तर युद्ध सुरु असताना पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात माधुरी हिची मागणी केलेली यावर संतापलेल्या कॅप्टनने सडेतोड उत्तर दिलं.
सध्या ज्या गोष्टीची चर्चा सुरु आहे, तो किस्सा 1999 मधील भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यानचा आहे. पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सैनिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात बॉलिवूड अभिनेत्रींची डिमांड केली होती. ज्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं.
घडलेली घटना शहीद कॅप्टन बत्रा यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. पाकिस्तानी सैनिकांसोबत भारतीय सैनिक युद्ध करत होतं आणि त्यामध्ये अनेक भारतीय जवानांचे मृतदेह पारिस्तानच्या हद्दीत होते. गोळीबार सुरु असल्यामुळे भारतीय सैनिकांचे मृतदेह आणता आलं नाही.
पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता आणि भारत देखील पाकिस्तानला प्रत्युत्तर देत होता. अशात एका पाकिस्तानी सैनिकाचा आवाज आवाज आला. ‘आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही निघून जाऊ…’ तेव्हा बटालियनचे कॅप्टन विक्रम बत्रा यांनी त्यांच्या एके 47 मधून गोळीबार केला आणि पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाले, “माधुरीकडून प्रेमाने”. त्या काळात या घटनेची खूप चर्चा झाली.
फक्त माधुरीच नाही तर, पाकिस्तानने रवीना टंडन हिची देखील मागणी केलेली. युद्धात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले. म्हणून भारतीय सैनिकांनी इतर सैनिकांच्या मृतदेहांची मागणी केली. यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी रवीना टंडनची मागणी केली होती.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देखील एका मुलाखतीत कबुल केलं होतं की, त्यांना अभिनेत्री रवीना टंडन प्रचंड आवडते. शिवाय ते अभिनेत्रीचे मोठे चाहते देखील आहेत. जेव्हा भारतीय सैनिकांना कळलं तेव्हा त्यांनी शरीफ यांनी एका मिसाईल पाठवली आणि त्यावर लिहिलं होतं ‘रवीना टंडन हिच्याकडून नवाज शरीफ यांच्यासाठी…’, तो फोटो आजही व्हायरल होत असतो.