स्मृती मानधना सोबत Long Distance Relationship कसं संभाळायचा पलाश? म्हणाला, कठीण होतं म्हणूनच

Long Distance Relationship खरंच टिकतात? क्रिकेटमध्ये मग्न असलेल्या स्मृतीसोबत पलाश कसं संभाळायचा रिलेशन? म्हणालेला, 'प्रचंड कठीण होतं म्हणूनच...', सध्या सर्वत्र पलाश आणि स्मृती यांच्या नात्याची चर्चा...

स्मृती मानधना सोबत  Long Distance Relationship कसं संभाळायचा पलाश? म्हणाला, कठीण होतं म्हणूनच
Palaash Muchhal
Updated on: Nov 29, 2025 | 12:17 PM

Long Distance Relationship of Palaash Muchhal and Smriti Mandhana : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर रोजी स्मृती आणि पलाश यांचं लग्न होणार होतं. पण ते होऊ शकलं नाही… सुरुवातीला स्मृती हिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे लग्न पुढ ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण त्यानंतर पलाश याने स्मृतीची फसवणूक केल्याच्या चर्चांनी जोर धरला…

लग्न रद्द झाल्यानंतर पलाश मुच्छल याच्याबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. दरम्यान, पलाश याचे काही खासगी चॅट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये पलाश याने स्मृती हिच्यासोबत असलेल्या Long Distance Relationship चा देखील उल्लेख केला… एवढंच नाही तर, एका मुलाखतीत पलाश याने स्मृती कायम क्रिकेटमध्ये व्यस्त असताना नातं कसं संभाळतोस? असा प्रश्न देखील विचारण्यात आलेला. यावर पलाश याने मोठं वक्तव्य केलं होतं.

सध्या पलाश याची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. मुलाखतीत पलाश म्हणतो, ‘स्मृती हिचे वेळ मॅनेज करणं फार कठीण असतं… जेव्हा मी फ्री असतो, तेव्हा स्मृताला काम असतं आणि जेव्हा ती फ्री असते… तेव्हा माझ्याकडे वेळ नसतो… ही एक मोठी अडचण आहे. पण आम्हाला चांगलं वाटतं…’

पुढे स्मृती हिच्या फिटनेसचं कौतुक करत पलाश म्हणाला, ‘स्मृती हिला मी काहीच सांगू शकत नाही. कारण त्यांची फिटनेस नेक्स्ट लेवल असते… क्रिकेट टीम प्रचंड प्रोफेशनल आहे.. आपल्याला वाटतं संपूर्ण भारताला क्रिकेट खेळता येतं… पण त्यांचं फिटनेस कमालीचं असतं..’

सांगायचं झालं तर, स्मृतीने ‘केबीसी’मध्ये पार्टनर कसा असावा याबद्दल सांगितलं होतं… स्मृती हिला असा जोडीदार हवा आहे, जो तिला आणि क्रिकेटसाठी असलेल्या तिच्या प्रेमाला समजून घेईल… कारण क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे तिच्याकडे फार वे नसतो… असं देखील स्मृती म्हणाली होती.

सांगायचं झालं तर, सध्या सर्वत्र फक्त स्मृती आणि पलाश यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, अनेक दावे देखील केले जात असून सोशल मीडियावर पलाश याचे एक्सगर्लफ्रेंडसोबत अनेक फोटो देखील व्हायरल होत आहेत. पण यावर स्मृती आणि पलाश यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.