पलक तिवारी-इब्राहिमच्या लव्हस्टोरीचा The End ? 3 वर्षांच्या डेटिंगनंतर मार्ग वेगळे !

Palak Tiwari-Ibrahim Ali Khan Separation : अभिनेत्री पलक तिवारी आणि अभिनेता इब्राहिम अली खान गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कथित रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. दोघांनीही कधी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली नसली, तरी अनेकदा एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता या कथित कपलबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, पलक आणि इब्राहिम यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पलक तिवारी-इब्राहिमच्या लव्हस्टोरीचा The End ? 3 वर्षांच्या डेटिंगनंतर मार्ग वेगळे !
| Updated on: Oct 30, 2026 | 4:33 PM

बॉलिवूडमध्ये काही नाती अशी असतात, ज्यांची अधिकृत घोषणा होत नसली तरी त्यांची चर्चा मात्र कायम रंगलेली असते. पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांची कथित लव्हस्टोरीही अशीच आहे. कधी पार्टीत, तर कधी एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना हे दोघे अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, आता तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचा दावा केला जात आहे.

इब्राहिमने घेतला ब्रेकअपचा निर्णय ?

Loading...

‘Hindustan Times’ च्या 30 ऑक्टोबरच्या वृत्तानुसार, दोघांच्या जवळच्या सूत्रांनी त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्टमधील सूत्रांच्या माहितीनुसार, नातं संपवण्याचा पुढाकार इब्राहिम अली खानने घेतला होता. मात्र, दोघांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

काही रिपोर्ट्समध्ये दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे, इब्राहिमचा एका सेलिब्रिटी टॉक शोमधील एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या शोमधील सहभागापेक्षा ब्रेकअपच्या बातम्यांचीच अधिक चर्चा होऊ नये, अशी दोघांची इच्छा असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

नुकतेच रणथंभोरमध्ये आले होते एकत्र!

पलक आणि इब्राहिम यांच्या ब्रेकअपच्या बातमीमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच दोघे राजस्थानमधील रणथंभोर येथे एकत्र दिसले होते. तिथे त्यांनी टायगर सफारीचा आनंद घेतल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे अलीकडेच एकत्र दिसलेल्या या जोडीच्या ब्रेकअपच्या चर्चांनी अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे.

विशेष म्हणजे, दोघे अजूनही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत आहेत. दरम्यान, दोघांना एकत्र घेऊन काही शूट्सचं नियोजन करण्यात आल्याचीही माहिती आहे. मात्र, आता हे शूट्स रद्द करण्यात आले आहेत किंवा तूर्तास थांबवण्यात आले आहेत, असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. सध्या दोघांनाही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

2022 मध्ये सुरू झाल्या होत्या डेटिंगच्या चर्चा

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा 2022 मध्ये सुरू झाल्या होत्या. त्यावेळी दोघांना मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून एकत्र बाहेर पडताना पाहण्यात आलं होतं. पापाराझींच्या कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी पलकने आपला चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर दोघे अनेकदा पार्टी, इव्हेंट आणि व्हेकेशनदरम्यान एकत्र दिसले.

2023 मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरी याच्याशी संबंधित एका वादादरम्यानही पलक आणि इब्राहिमच्या नात्याची चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबाबत मौन बाळगलं होतं. एका मुलाखतीत इब्राहिमने पलकला केवळ आपली चांगली मैत्रीण असल्याचं म्हटलं होतं.

पलक तिवारी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. तिने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर इब्राहिम अली खान हा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांचा मुलगा आहे. त्याने ‘नादानियां’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us