सलमानने ‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलरमधून पलक तिवारीला केलं गायब; अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

पलकने याआधीही सलमानसोबत काम केलं होतं. 'अंतिम' या चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. हार्डी संधूच्या 'बिजली' या म्युझिक व्हिडीओमध्ये ती सर्वांत पहिल्यांदा झळकली होती. या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता.

सलमानने किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरमधून पलक तिवारीला केलं गायब; अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
Palak Tiwari and Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2023 | 9:18 AM

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून ती बॉलिवूड इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवतंय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र आपल्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच पलक गायब झाली आहे. यावर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रतिक्रिया दिली आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल आणि विनाली भटनागर अशी मोठी स्टारकास्ट आहे. येत्या 21 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलकला ट्रेलरमधून गायब झाल्याबद्दल तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ती म्हणाली, “मी या चित्रपटाचा एक भाग आहे, यातच मी खुश आहे. प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर मला माहीत होतं की हा चित्रपट प्रेक्षक मला बघण्यासाठी येणार नाहीत. माझ्या असण्याने किंवा नसण्याने फारसा फरक पडत नाही. कारण हा सलमान खानचा चित्रपट आहे. एक नवोदित कलाकार म्हणून माझ्यासाठी ही गोष्ट थोडी कठीण आहे. पण ती भूमिका माझ्यासाठी होती म्हणून मी नि:स्वार्थ बनले. एवढ्या कलाकारांमध्ये मी वेगळी कशी उठून दिसेन यापेक्षा मला त्यात फक्त माझं योगदान द्यायचं होतं.”

पलकने याआधीही सलमानसोबत काम केलं होतं. ‘अंतिम’ या चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. हार्डी संधूच्या ‘बिजली’ या म्युझिक व्हिडीओमध्ये ती सर्वांत पहिल्यांदा झळकली होती. या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पलकला विविध पार्ट्यांमध्ये इतर स्टारकिड्ससोबत अनेकदा पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे तर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमला ती डेट करत असल्याचीही चर्चा आहे.