Palash Muchhal : लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल पुन्हा गोत्यात, मोठ्या प्रकरणात अडकला, थेट गुन्हा दाखल

स्मृती मंधानाचा एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल आता पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर सांगलीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

| Updated on: May 05, 2026 | 5:22 PM
1 / 5
 बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार पलाश मुच्छलच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्या बालमित्राने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार पलाश मुच्छलच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्या बालमित्राने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

2 / 5

सांगलीतील शास्त्रीनगर परिसरात राहणारे विज्ञान प्रकाश माने वय 34 यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पलाश मुच्छलने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. हा प्रकार 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोल नाका परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

3 / 5

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2025 साली पलाश मुच्छलने विज्ञान माने यांच्याशी संपर्क साधून चित्रपट निर्मितीसाठी 25 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर माने यांनी वारंवार पैशांची मागणी केली. 22 नोव्हेंबर रोजी त्यांनी पुन्हा रकमेची मागणी केल्यावर वाद निर्माण झाला आणि त्यावेळी शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

4 / 5

यापूर्वीही या प्रकरणामुळे पलाश मुच्छल चर्चेत आला होता. नोव्हेंबर महिन्यात सांगली येथे स्मृती मंधाना आणि त्याचा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही कारणांमुळे तो विवाह रद्द झाला. त्यानंतर जानेवारी महिन्यात विज्ञान माने यांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रारही केली होती.

5 / 5

या नव्या तक्रारीनंतर सांगली शहर पोलिसांनी पलाश मुच्छलच्याविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अॅट्रॉसिटी कलम 3(1) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिस अधिक माहिती गोळा करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us