Panchayat Season 5 Official Trailer: ‘पंचायत 5’ मध्ये अनपेक्षित ट्वीस्ट! भुषणने केले सचिवजींचे हाल.. धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो पंचायत सीझन 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. अमॅझोन प्राईमवर 3 डिसेंबर रोजी ही धमाकेदार बेवसिरीज प्रदर्शित होणार आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मंजु देवी, सचिवजी अन् त्यांच्या संपूर्ण टीमचे पुढे काय होणार? याचीच धमाकेदार झलक या  ट्रेलरमध्ये दिसत आहे. 

Panchayat Season 5 Official Trailer: पंचायत 5 मध्ये अनपेक्षित ट्वीस्ट! भुषणने केले सचिवजींचे हाल.. धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Panchayat Season 5 Official Trailer
Image Credit source: Panchayat Season 5 Official Trailer
| Updated on: Nov 23, 2026 | 6:34 PM

Panchayat Season 5 Official Trailer:  ओटीटीवर पुन्हा एकदा हास्याचा अन् ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा धुरळा उडणार आहे. कारण ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो पंचायत सीझन 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. अमॅझोन प्राईमवर 3 डिसेंबर रोजी ही धमाकेदार बेवसिरीज प्रदर्शित होणार आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मंजु देवी, सचिवजी अन् त्यांच्या संपूर्ण टीमचे पुढे काय होणार? याचीच धमाकेदार झलक या  ट्रेलरमध्ये दिसत आहे.

पंचायत सीझन 5 चा धमाकेदार ट्रेलर! 

Loading...

प्राइम व्हिडिओने आज सर्वात लोकप्रिय कॉमेडी-ड्रामा सिरीज ‘पंचायत सीझन 5’ चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला. फुलोरामध्ये झालेले सत्ताबदल आणि  नवीन युगासह, ‘पंचायत’ एका नवीन सीझनसह परत येत आहे. या वेळी प्रेक्षकांना भावनांचा समृद्ध मिलाफ, हृदयस्पर्शी क्षण आणि ग्रामीण भारताची एक प्रामाणिक, अनोखी झलक अनुभवायला मिळेल.

ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, फुलेरामध्ये भुषण आणि क्रांती देवी यांची सत्ता आल्यानंतर सचिवजी आणि त्यांच्या टीमचे चांगलेच हाल सुरु आहेत. भुषणची सत्तेचा पुरेपुर फायदा घेत सचिवजी आणि विकासला कामाला जुंपले आहे. दुसरीकडे रिंकी अन्  अन् सचिवजींच्या प्रेमाची कहाणीही नेमकी भुषणलाच समजते. त्यामुळे या सिझनमध्ये मनोरंजन अन् कुरघोड्यांचा धमाका पाहायला मिळणार आहे.

या सीझनचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले असून, निर्मिती दीपक कुमार मिश्रा, चंदन कुमार आणि अरुणाभ कुमार यांनी केली आहे, तर लेखन चंदन कुमार यांनी केले आहे. याची निर्मिती ‘द व्हायरल फीवर’ (TVF) ने केली आहे. ‘पंचायत सीझन ५’ मध्ये पुन्हा एकदा तोच कलाकारांचा संच आहे, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवार, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक यांचा समावेश आहे. हा सीझन ३ डिसेंबर २०२६ रोजी भारतात आणि जगभरातील 240 देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us