‘मित्रा तुझी खूप आठवण येईल…’ पंकज धीर यांच्या निधनाने अभिनेता हळहळला; महाभारतात केली होती अर्जुनची भूमिका

अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले आहे. 'महाभारता'तील 'कर्ण' या भूमिकेने ते घराघरात पोहोचले होते आणि ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एका अभिनेत्याने त्यांना भावूक श्रद्धांजली अर्पण केली आहे आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

मित्रा तुझी खूप आठवण येईल... पंकज धीर यांच्या निधनाने अभिनेता हळहळला; महाभारतात केली होती अर्जुनची भूमिका
Pankaj Dheer, passes away
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2025 | 3:08 PM

लोकप्रिय चित्रपट तथा महाभारतातील कर्णाची भूमिका आजरामर करणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते कर्करोगाशी झुंजत होते अखेर 15 ऑक्टोबरला त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज हे महाभारतातील कर्णाच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध होते. आजही त्यांची ही कर्णाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. प्रेक्षकांनी या भूमिकेला भरभरून प्रेम दिलं.

अभिनेते पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते असं म्हटलं जातं. उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. अखेर त्यांचे निधन झाले. 15 ऑक्टोबर रोजी हे जग सोडून गेले. पंकज धीर हे दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत या चित्रपटात कर्णाची प्रतिष्ठित भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे

पंकज धीर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी केवळ टेलिव्हिजनवरच नव्हे तर चित्रपटांमध्येही अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. पंकज आता आपल्यात नाहीत यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. तसेच त्यांच्या निधनाच्या बातमीवर अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच त्यांच्या जवळच्या मित्रांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. महाभारतात त्यांच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने दु:ख व्यक्त केलं आहे. हा अभिनेता पंकज यांचा फार जवळचा मित्रही आहे.

या अभिनेत्याची भावनिक पोस्ट 

महाभारत टीव्ही शोमध्ये अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनीही पंकज धीर यांच्या निधनाची पुष्टी केली. पंकज आणि फिरोज खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र. त्यांच्या मित्राच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना फिरोज यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “अलविदा, माझ्या मित्रा, आम्हाला तुझी खूप आठवण येईल.” एकंदरीत, पंकज यांचे अचानक जाणे हा चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे कुटुंब आणि मित्रमंडळी शोकात बुडाले आहेत आणि अनेकजण सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अंत्यसंस्कार कधी होणार?

पंकज धीर यांच्यावर आज संध्याकाळी 4.30 वाजाता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पश्चिम मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस जवळ त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.