शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला? पती पराग त्यागीने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘मला माहिती…’

अभिनेत्री शेफाली जरीवालच्या निधनानंतर पती पराग त्यागीचा मोठा खुलासा. नेमकं निधन कशामुळे झालं अभिनेत्याने सांगून टाकलं.

शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला? पती पराग त्यागीने केला मोठा खुलासा, म्हणाला- मला माहिती...
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 18, 2026 | 1:56 PM

TV Actress : टीव्हीमधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या अवघ्या 42 व्या निधन झालं. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली होती. तिचं निधन 27 जून 2025 मध्ये कार्डियक अरेस्ट आल्याने निधन झालं. शेफालीच्या अचानक जाण्याने तिचं कुटुंबच नाही तर लाखो चाहतेही शोकसागरात बुडाले होते. आजही अनेकांना हे वास्तव स्वीकारणं कठीण जात आहे की ‘कांटा लगा गर्ल’ आता आपल्यात नाही.

शेफालीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर आणि इंडस्ट्रीमध्ये अनेक चर्चा रंगल्या. काही जणांनी तिच्यावर काळी जादू करण्यात आल्याचा दावाही केला होता. आता या सर्व चर्चांवर स्वतः शेफालीचा पती आणि अभिनेता पराग त्यागीने पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे.

शेफालीचे निधन कसे झाले?

अभिनेता पारस छाबडा यांच्या पॉडकास्टमध्ये पराग त्यागीने दिलेल्या मुलाखतीत त्याने पत्नी शेफालीच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा केली. पारस छाबडाने सांगितलं, मला नाही वाटत की शेफालीसोबत कोणी काळी जादू करू शकेल. यावर पराग त्यागीने अत्यंत ठामपणे प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘खूप लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. पण मला वाटत नाही, मला माहिती आहे की कुणीतरी असं केलं होतं. तिला अचानक कार्डियक अरेस्ट आला. सीपीआरसुद्धा कामाला आला नाही. काहीच उपयोग झाला नाही असं तिने म्हटलं.

परागने पुढे भावनिक होत जीवनाविषयी आणि कर्माविषयीही भाष्य केलं. ‘शेवटी कर्मच आपल्या सोबत जातं. इथे काहीच राहत नाही आणि काहीच घेऊन जाता येत नाही. माझी बायको ट्रॅक पँट आणि शर्टमध्ये या जगातून गेली. माफी मागून सांगतो, आजच्या काळात लोकांना आई-वडिलांचंही मोल उरलेलं नाही, भावंडांची तर अजिबातच नाही. लोक इमोशन्सशी खेळतात’ असे पराग त्यागीने दुःख व्यक्त करत सांगितले.

‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध

शेफाली जरीवाला हिने 2002 मध्ये सुपरहिट म्युझिक व्हिडिओ ‘कांटा लगा’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या गाण्यामुळे ती घराघरात पोहोचली आणि ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर तिने अनेक म्युझिक व्हिडिओ, टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर शेफालीने 2004 मध्ये संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी लग्न केलं होतं, मात्र 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2014 मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं.