AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज

अभिनेत्री परिणिती चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. तिने चोप्रा आणि चड्ढा कुटुंबामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे.

चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज
Pareeniti ChopraImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 25, 2025 | 12:32 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण परिणिती चोप्रा ही कायमच चर्चेत राहिली आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. परिणीती चोप्राने खासदार राघव चड्ढा याच्यासोबत अत्यंत खास पद्धतीने राजस्थानमध्ये लग्न केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नानंतर परिणिती गूडन्यूज कधी देणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता परिणितीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गूड न्यूज दिली आहे.

काय आहे परिणितीची पोस्ट?

परिणिती आणि राघव यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर 1+1=3 असं लिहिली आहे. तसेच पुढे राघव आणि परिणितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती दोघेही चालताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत परिणितीने, ‘आमचे छोटेसे जग… देवाच्या कृपेने लवकरच येणार आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

वाचा: आदेश बांदेकरांच्या लेकासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पूजा बिरारीची प्रतिक्रिया, म्हणाली ‘ज्यांना माहीत आहे…’

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

नेटकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

सोशल मीडियावर परिणितीने शेअर केलेली पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी परिणिती आणि राघव यांचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी परिणितीला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणिती आणि राघव विषयी

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर 2023 रोजी लग्न केले आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. उदयपूरमध्ये दोघांचं डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं होतं. राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. अनेकवर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आा त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण