‘चमकीला’ चित्रपटासाठी परिणीती चोप्रा हिने वाढवले तब्बल 15 किलो वजन, अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत..
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्रा हिचे काही दिवसांपूर्वीच अत्यंत शाही पद्धतीने लग्न राजस्थान येथे पार पडले. परिणीती चोप्रा हिच्या लग्नाला अत्यंत खास लोक उपस्थित दिसले. या लग्नाची काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मुंबई : परिणीती चोप्रा ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. परिणीती चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच आप नेता राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर नव्या कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना परिणीती चोप्रा दिसली. आता परिणीती चोप्रा ही परत एकदा आपल्या कामावर परतल्याचे बघायला मिळतंय. परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओसोबतच तिने खास कॅप्शन देखील शेअर केल्याचे बघायला मिळतंय. परिणीती चोप्रा हिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
परिणीती चोप्रा हिने शेअर केलेला हा व्हिडीओ जिममधील दिसतोय. विशेष म्हणजे जिममध्ये चांगलाच घाम गाळताना परिणीती चोप्रा दिसत आहे. परिणीती चोप्रा हिने तिचा आगामी चित्रपट ‘चमकीला’साठी तब्बल 15 किलो वजन वाढवले. आता चित्रपटाची शूटिंग झाल्यानंतर तिने वजन कमी करण्यावर भर दिल्याचे बघायला मिळतंय.
वजन कमी करण्यासाठी चांगलीच मेहनत घेताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे. चमकीला हा परितीची चोप्राचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा निर्मात्यांना नक्कीच आहेत. काही दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा हिचा मिशन रानीगंज हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करता नाही आला.
View this post on Instagram
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा हे मिशन रानीगंज या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होते. हा खास व्हिडीओ शेअर करत परिणीती चोप्रा हिने लिहिले की, गेली सहा महिने मी रहमान सरांच्या स्टुडिओमध्ये घालवली आहेत. चमकिला चित्रपटासाठी मी 15 किलो वजन वाढवले आहे. जंक फूड खाऊन मी घरी जात असत.
परिणीती चोप्रा म्हणाली की, संगीत आणि खाणे माझे रूटीन झाले. आता चित्रपट तयार झालाय…मला स्टुडिओची आठवण येतंय. परिणीती हिने बरीच मोठी पोस्ट लिहिल्याचे बघायला मिळतंय. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळत आहेत. चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
