कुर्रर्रर्र…. परिणिती चोप्रा-राघव चड्ढाच्या लेकाचं नाव समोर, अर्थ खूपच खास, पाहा पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांनी नुकतेच त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. बाळाच्या जन्मानंतर जवळपास एका महिन्याने या सेलिब्रिटी जोडप्याने पोस्ट शेअर करत नावाचा खुलासा केला आहे.

कुर्रर्रर्र.... परिणिती चोप्रा-राघव चड्ढाच्या लेकाचं नाव समोर, अर्थ खूपच खास, पाहा पहिला फोटो
parineeti chopra raghav chadha baby name
Updated on: Nov 19, 2025 | 12:46 PM

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना काही दिवसांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले. आता त्या दोघांनी त्यांच्या लेकाचे नाव जाहीर केले आहे. बाळाच्या जन्मानंतर जवळपास एका महिन्याने या सेलिब्रिटी जोडप्याने सोशल मीडियावर नावाची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्यांनी आपल्या लेकाचा पहिला फोटोही शेअर केला आहे.

परिणिती चोप्राने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते दोघेही बाळाच्या पायाला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत परिणिती आणि राघवने बाळाचे पाय हातात पकडल्याचे दिसत आहे. या फोटोला हटके कॅप्शन देत त्यांनी बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे.

परिणिती चोप्रा-राघव चड्ढाच्या बाळाचे नाव काय?

परिणिती आणि राघव यांनी त्यांच्या बाळाचे नाव नीर असे ठेवले आहे. नीर या शब्दाचा मूळ अर्थ पाणी असा होता. त्यासोबतच त्यांनी या पोस्टमध्ये एक संस्कृत श्लोकही टाकला आहे. ‘जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् – तत्र एव नीर, असे म्हटले आहे. याचा अर्थ जो पाण्याचे रूप आहे आणि प्रेमाचे स्वरूप आहे, तोच नीर’ असा होतो. आमच्या हृदयाला कायमस्वरूपी आणि परिपूर्ण आनंद मिळाला आणि आम्ही त्याला ‘𝗡𝗲𝗲𝗿’ असे नाव दिले. शुद्ध, दिव्य, अमर्याद, असे परिणितीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

परिणिती चोप्राची पोस्ट

बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान परिणिती चोप्राने १९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलाला जन्म दिली. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. यावेळी त्यांनी मुलगा झाल्याचे जाहीर केले होते. या गुडन्यूजनंतर चड्ढा आणि चोप्रा कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता परिणितीने बाळाचे नाव जाहीर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी तसेच बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा हे २४ सप्टेंबर २०२३ रोजी विवाहबंधनात अडकले होते. राजस्थानमधील उदयपूर येथील ‘द लीला पॅलेस’ या आलिशान ठिकाणी त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. पारंपारिक हिंदू पद्धतीने ते विवाहबद्ध झाले होते. तसेच १३ मे २०२३ रोजी नवी दिल्ली येथे या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या विवाहसोहळ्याला बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. हा विवाहसोहळा अत्यंत भव्यदिव्य आणि खासगी पद्धतीने संपन्न झाला होता.