
मुंबई : झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. एवढंच नाही तर, आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण आहे. याबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या असतात. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे, अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या खासगी आयुष्याबद्दल. काही दिवसांपूर्वी खासदार राघव चड्ढा आणि परिणीती यांना एका हॉटेलबाहेर स्पॉट करण्यात आलं. तेव्हापासून दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढंच नाही तर, दोघे येत्या आठवड्यात साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत.
पण राघव चड्ढा यांच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगण्यापूर्वी दोन सेलिब्रिटींना देखील परिणीतीने डेट केलं आहे. पण दोघांसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर परिणीतीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमाचं दिग्दर्शन मनीष शर्मा याने केलं.
एक काळ असा देखील होता, जेव्हा परिणीती आणि मनीष यांच्या नात्याने जोर धरला. एका मुलाखतीत दोघांना त्यांच्या नात्याबद्दल देखील विचारण्यात आलं. दोघांनी देखील नात्याला नकार दिला. मनीष शर्मा याच्या नंतर अभिनेत्रीचं नाव चरित देसाई याच्यासोबत जोडण्यात आलं.
चरित आणि परिणीती यांनी देखील कधीच त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही, पण कधी नात्याला नकार देखील दिला नाही. तेव्हा चरित धर्मा प्रॉडक्शनमध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. दोन सेलिब्रिटींसोबत नात्याची चर्चा रंगल्यानंतर आता परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या आहेत.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिणीती – राघव साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. बहिणीच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिल्ली येथे पोहोचली आहे असं सांगण्यात यात आहे. दिल्लीत मोठ्या थाटात परिणीती – राघव यांचा साखरपुडा होणार असल्याच्या चर्चांनी वेग घरला आहे. सध्या सर्वत्र परिणीती – राघव यांच्या नात्याचीच चर्चा सुरु आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लवकरच परिणीती – राघव साखरपुडा करण्याची शक्यता आहे. अत्यंत खासगी पद्धतीत दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. या सोहळ्यात मित्र परिवार आणि कुटुंब सहभागी होणार आहे.’ पण याबद्दल चोप्रा आणि चड्ढा कुटुंबियांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. रविवारी दोघांना विमानतळावर देखील स्पॉट करण्यात आलं.