Support : झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत परिणीती चोप्रा, ट्विट करून म्हणाली…

सध्या सोशल मीडियावर झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय बद्दलचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

Support : झोमॅटो डिलिव्हरी बॉयसोबत परिणीती चोप्रा, ट्विट करून म्हणाली...
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: चेतन पाटील

Mar 14, 2021 | 6:59 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय बद्दलचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. मेकअप आर्टिस्ट हितेशा चंद्रानीने या व्हिडीओमध्ये झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी बॉयने तिला मारहाण केलाचा दावा केला होता. घरात घुसून आपल्याला मारहाण झाली असल्याचे महिलेने सांगितले आहे. यासर्व प्रकरणानंतर झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कामराजने देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. त्याचे म्हणणे आहे की, या महिलेने चपलेने मारहाण केल्याने तो तेथून पळून आला आणि त्या महिलेचा हात चुकून तिच्या नाकाला लागला होता. (Parineeti Chopra tweeted from the Zomato Food Delivery Boy incident)

त्यानंतर तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. आता या सर्व प्रकरणामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्राने एक ट्वीट केले आहे आणि यामुळे आता सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. परिणीतीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, झोमॅटो इंडिया कृपया लवकर सत्य शोधा आणि जाहीरपणे सांगा..जे सत्य आहे ते… जर तो माणून निर्दोष असेल (पण मला विश्वास आहे की तो निर्दोष आहे) तर त्या महिलेला देखील दंड देण्यास आम्हाला मदत करा.. हे अमानुष, लज्जास्पद आहे.. कृपया मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकते हे मला कळवा’

हितेशा चंद्राणीने झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मारहाण केल्याचे सांगत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. आणि ज्यावेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला त्यावेळी त्यांच्या नाकातून रक्त वाहत होते. व्हिडीओमध्ये हितेशा सांगताना दिसत होत्या की, माझी झोमॅटो डिलिव्हरी ऑर्डर उशिरा आली आणि मी कस्टमर केअरसोबत बोलत होते, यादरम्यान डिलिव्हरी बॉयने हे केलं.

यानंतर डिलिव्हरी बॉय कामराजने सांगितले की, मी उशिरा ऑर्डर घेऊन महिलेच्या घरी पोहोचल्याने तिने ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. तिला ती ऑर्डन पैसे न देता घ्यायची होती. तिने मला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी स्वत:ला वाचवण्यासाठी तेथून पळून आलो. हितेशाचा आणि त्या डिलिव्हरी बॉय या दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी हितेशाची बाजू घेतली तर काहींनी डिलिव्हरी बॉयची आता परिणीतीच्या ट्वीटमुळे हे प्रकरण आणखीन गाजत आहे.

संबंधित बातम्या : 

Video : रणबीर कपूर आजारी असतानाही आलियाचा डान्सिंग मूड, लग्नात ‘गेंदा फूल’वर थिरकली !

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली ‘या’ दिवशी अक्षयचा ‘सूर्यवंशी’ होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित !

Kangana Ranaut : ‘या प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल,’ कंगनाचं मोठं वक्तव्य

(Parineeti Chopra tweeted from the Zomato Food Delivery Boy incident)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें