Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघवच्या लग्नात भाग्यश्रीचे ठुमके; कपड्यांमुळे जोरदार ट्रोल

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या संगीत कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्री भाग्यश्रीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये 'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्री राजस्थानी लोकगीतावर नाचताना दिसत आहेत.

Parineeti Raghav Wedding | परिणीती-राघवच्या लग्नात भाग्यश्रीचे ठुमके; कपड्यांमुळे जोरदार ट्रोल
Actress Bhagyashree
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2023 | 8:29 AM

उदयपूर | 25 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा नुकतेच लग्नबंधनात अडकले. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ या आलिशान हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील विविध पाहुणे उपस्थित होते. परिणीती आणि राघव यांच्या रिसेप्शन पार्टीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने परिणीतीच्या लग्नातील एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भाग्यश्री राजस्थानी लोकगीतावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काहीजण भाग्यश्रीच्या डान्सचं कौतुक करत आहेत. तर अनेकांनी तिला तिच्या कपड्यांवरूनही ट्रोल केलं आहे.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यासाठी भाग्यश्री पती हिमालय दासानीसोबत उदयपूरला पोहोचली. परिणीती-राघवच्या संगीत कार्यक्रमात पंजाबी गायक नवराज हंसला आमंत्रित करण्यात आलं होतं. संगीत कार्यक्रमानंतरचा हा व्हिडीओ भाग्यश्रीने पोस्ट केला आहे. यामध्ये ती राजस्थानी महिलांसोबत लोकगीतावर नाचताना दिसतेय. 54 वर्षीय भाग्यश्रीचा हा खास अंदाज पाहून काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.

पहा व्हिडीओ

‘कुछ प्यार, कुछ मस्ती.. संगीत, डान्स आणि मनोरंजनाची रात्र’, असं कॅप्शन देत भाग्यश्रीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती पूलच्या बाजूला राजस्थानी महिलांसोबत थिरकताना दिसतेय. त्या महिलांनी राजस्थानचा पारंपरिक पोशाख केला आहे. मात्र भाग्यश्री टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसून आली. यावरूनच तिला काहींनी ट्रोल केलं. ‘सार्वजनिकरित्या हा व्हिडीओ पोस्ट करण्याच्या दृष्टीने तुमची ड्रेसिंग खूपच वाईट आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुमचा आऊटफिट अजिबात आवडला नाही. तुम्ही सुद्धा पारंपरिक पोशाख परिधान करायला हवा होता’, असं दुसऱ्याने म्हटलंय. भाग्यश्रीच्या या व्हिडीओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

भाग्यश्री लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत पती हिमालयसुद्धा दिसला होता.