Pathaan Review | ‘पठाण’च्या पहिल्या शोनंतर प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या कसा आहे शाहरुखचा चित्रपट?

सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पठाणचा पहिला शो संपला असून त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. पहिला शो संपल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pathaan Review | पठाणच्या पहिल्या शोनंतर प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या कसा आहे शाहरुखचा चित्रपट?
Pathaan
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 25, 2023 | 8:14 AM

मुंबई: बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून कमबॅक केलं आहे. त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पठाणचा पहिला शो संपला असून त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. पहिला शो संपल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना किंग खानचा हा ॲक्शनपट फारच आवडला आहे. ‘पठाण हा ब्लॉकबस्टर ठरेल यात काही शंका नाही. किंग परतला आहे. हा चित्रपट म्हणजे संपूर्ण पॅकेज आहे,’ असं ट्विट एका युजरने केलं आहे. तर ‘पठाण हा सुपर डुपर हिट ठरेल,’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

‘पठाणमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. शाहरुखचा परफॉर्मन्स खूपच जबरदस्त आहे. दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमनेही दमदार कामगिरी केली आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्याने कौतुक केलं आहे. यात बरेच सरप्राइज आणि ट्विस्ट असल्याचंही नेटकऱ्यांनी सांगितलं आहे.

पठाणच्या क्लायमॅक्स सीनवरही काहींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘क्लायमॅक्स अविश्वसनीय आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ट्विस्ट आणि टर्न्समुळे क्लायमॅक्स जबरदस्त ठरतो’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.

‘पठाण’मध्ये शाहरुखने सैनिकाची भूमिका साकारली आहे. आपल्या मातृभूमीला मोठ्या धोक्यापासून वाचवण्यासाठी पठाण भारतात परततो. यामध्ये जॉनने नकारात्मक भूमिका साकारली आहे. तर दीपिका पदुकोण स्पायच्या भूमिकेत आहे. यामध्ये अभिनेता सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतो. तर डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.