
मुंबई | 31 डिसेंबर 2023 : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिका ऑफएअर झाली असली तरी, मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, मालिकेतील कलाकारांना देखील चाहते आजही विसरु शकले नाही. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली. मालिकेतील कलाकार आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता देखील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तिच्या एका मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आशा नेगी. आशा हिने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या मुलीची भूमिका साकारली होती. सांगायचं झालं तर, आशा नेगी हिला पहिल्यांदा मुख्य भूमिकेत चाहत्यांना पाहाता आलं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळेच आशा हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
आज आशा नेगी हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या आशा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलींना लवकर यश मिळाल्यानंतर लोकांमध्ये काय चर्चा होते. लोक तिच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे बोलतात आणि विचार करू लागतात… याबद्दल आशा व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. व्हिडीओमध्ये आशा नेगी म्हणते, ‘मला असं वाटतं जर कोणत्या मुलीला लवकर यश मिळत असेल, मग ती तिच्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर चढत असले, तरी लोक म्हणतात, नक्की हिने बॉस, निर्माता, दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध ठेवले असतील. म्हणून हिला यश मिळालं आहे…’ सध्या आशा नेगी हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेची सुरुवात 2014 मध्ये झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये मालिका बंद झाली. मालिकेत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होते. दरम्यान, सुशांत याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.