Pawan Kalyan Divorced: तिन्ही लग्न फेल, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा तिसरा घटस्फोट, पहिल्या पत्नीने तर केलेले गंभीर आरोप
Pawan Kalyan and Anna Konidala : आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा तिसरं लग्न मोडलं आहे. रशियन महिला अॅनासोबत थाटलेला संसार आता मोडला आहे.

Pawan Kalyan and Anna Konidala Divorced: दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. दोनदा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर, या अभिनेत्याने अखेर आंध्र प्रदेशातील पिठापुरम मतदारसंघातून निवडणूक जिंकली. अभिनय आणि राजकारणापलीकडे, पवन कल्याण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. या अभिनेत्याने एकदा, दोनदा नव्हे, तर तीनदा लग्न केले आहे. आता त्यांचा तिसरा घटस्फोटही झाला आहे. अॅना या रशियन महिलेशी तिसरा विवाह केला होता.
पवन कल्याण म्हणाले,” त्यांनी हा निर्णय परस्पर सामंजस्य आणि आदराने घेतला आहे. ते चांगले मित्र म्हणून कायम राहतील असेही त्यांनी सांगितले. आमचा विवाह संपुष्टात आला असला तरी, आम्ही चांगले मित्र आणि आमच्या प्रिय मुलांचे समर्पित पालक म्हणून कायम आहोत. त्यांचे सुख आणि कल्याण हेच आमचे नेहमीच समान प्राधान्य असेल,” असे त्या निवेदनात म्हटले आहे.
पहिले आणि दुसरे लग्नही मोडले
चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका वर्षानंतर, १९९७ मध्ये पवन कल्याण यांनी नंदिनीशी लग्न केले. लग्नानंतर लगेचच, पवन कल्याण यांनी नंदिनीवर घर सोडून गेल्याचा आरोप केला होता. २००१ पासून ते वेगळे राहत आहेत. नंदिनीने २००७ मध्ये पवन कल्याणवर खटला दाखल केला होता, ज्यात तिने आरोप केला होता की, विवाहित असतानाच त्यांनी अभिनेत्री रेणू देसाईशी लग्न केले. पवनने आपल्या बचावात कबूल केले की ते आणि रेणू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पवन कल्याण आणि नंदिनी यांचा अखेर २००८ मध्ये घटस्फोट झाला आणि अभिनेत्याला त्याच्या पहिल्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी रुपये द्यावे लागले.
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर, पवन कल्याणने २००९ मध्ये रेणू देसाईशी लग्न केले. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि लग्नाच्या तीन वर्षांनंतर, २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, या जोडप्याला अकिरा नंदन नावाची एक मुलगी आणि आद्या नंदन नावाचा एक मुलगा आहे. २०१३ मध्ये, पवन कल्याणने रशियन मॉडेल ॲना लेझनेवाशी तिसऱ्यांदा लग्न केले होते.