
भारतातील प्रसिद्ध गेमिंग इन्फ्लूएन्सर पायल गेमिंग सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. एका धक्कादायक प्रकारामुळे पायल चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक एमएमएस व्हायरल होत आहे. त्यात पायल गेमिंगचं नाव चुकीच्या पद्धतीने जोडलं गेलं आहे. या क्लिपमध्ये एका महिला आणि पुरुषांचे इंटिमेट सीन आहेत. मात्र, ही महिला पायल असल्याचं सोशल मीडियामधून व्हायरल होत आहे. अनेक यूजर्सही ही महिला पायल असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे पायलला मोठा त्रास झाला असून तिने या बद्दल सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पायल गेमिंगचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे स्वत: पायलही हादरून गेली आहे. पायलने एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओत दिसणारी महिला मी नाहीये. माझ्या नावाचा आणि फोटोचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याने या विरोधात मी कोर्टात जाणार आहे, असं पायलने म्हटलं आहे.
मला कधीच वाटलं नव्हतं…
मला एवढ्या खासगी आणि वेदनादायी गोष्टीवर सार्वजनिकरित्या बोलावं लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. याबद्दल मला दु:ख होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन कंटेट प्रसारीत केला जात आहे. त्यात माझ्या नावाचा वापर केला जात असून त्या व्हिडीओशी माझा संबंध जोडला जात आहे. डीजिटल प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. मी तुम्हाला स्पष्टच सांगते की त्या व्हिडीओतील महिला मी नाहीये. या व्हिडीओचा आणि त्यातील महिलेचा माझं आयुष्य, माझी पसंत आणि माझ्या ओळखीशी काहीही संबंध नाही, असं पायलने म्हटलं आहे.
म्हणून आवाज उठवला पाहिजे
मी नेहमीच नकारात्मकतेच्या समोर मौन बाळगत असते. पण या परिस्थितीत बोलणं भाग आहे. तसेच आवाज उठवणं गरजेचं आहे. केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या प्रमाणेच ऑनलाईन गैरप्रकाराच्या शिकार ठरलेल्या असंख्य महिलांसाठी मला बोललं पाहिजे. हा केवळ हानी पोहचवणारा कंटेट नाहीये, तर तो मनावर घाव घालणारा आणि अमानवयीयही आहे, असंही तिने म्हटलंय.
कळकळीची विनंती…
पायलने सरतेशेवटी सर्वांनाच एक कळकळीची विनंती केली आहे. कृपा करून तो कंटेट कुणालाही शेअर करू नका. त्यावर कमेंट करू नका. त्यावर चर्चा करू नका. माझ्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असं सांगतानाच या परिस्थितीत मला साथ दिली, सहानुभूती दाखवली, माझ्याशी संपर्क साधला आणि मला धीर दिला अशा सर्वांची मी आभारी आहे. दया आणि विश्वास अशा प्रसंगात नक्कीच मोठी ताकद देण्याचं काम करतो, असंही तिने म्हटलंय.