AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी माणसावरच अन्याय?, ‘झलक दिखला जा 11’च्या विरोधात संतापाची लाट, गंभीर आरोप

jhalak dikhhla jaa 11 : झलक दिखला जा 11 शोच्या फिनालेला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. झलक दिखला जा 11 मध्ये स्पर्धेक धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. मात्र, शो विरोधात सोशल मीडियावर सतत संतापाची लाट ही बघायला मिळतंय. लोक मोठ्या प्रमाणात शोवर टीका करताना दिसत आहेत.

मराठी माणसावरच अन्याय?, ‘झलक दिखला जा 11’च्या विरोधात संतापाची लाट, गंभीर आरोप
| Updated on: Feb 26, 2024 | 2:28 PM
Share

मुंबई : ‘झलक दिखला जा 11’ हा शो सध्या मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी ही सातत्याने केली जातंय. फक्त हे नाही तर हा सर्व शो फिक्स असल्याचे देखील सांगितले जातंय. आता शोच्या विरोधात लोकांचा संताप हा चांगलाच वाढताना दिसतोय. ‘झलक दिखला जा 11’ विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट ही बघायला मिळतंय. लोकांना शोमध्ये घडलेला एक प्रकार हा अजिबातच आवडताना दिसत नाहीये. जोरदार टीका ही केली जातंय.

धनश्री हिने डिप्रेशनवर एक परफॉर्मेंस केला. तर शिव ठाकरे याने एनर्जेटिक डांन्स केला. मात्र, असे असताना देखील शिव ठाकरे याला शोमधून बाहेरचा रस्ता हा दाखवण्यात आला. दुसरीकडे शेवटच्या क्षणी शिव ठाकरे याचा कोरियाग्राफर बदलण्यात आला. यामुळे आता शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप हे केले जात आहेत. लोकांचा संताप वाढताना दिसतोय.

लोकांचे म्हणणे आहे की, शिव ठाकरे हाच विजेते पदासाठी प्रबळ दावेदार होता. मात्र, त्यांना मराठी माणसाला विजेता करायचे नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा गेम केलाय. शिव ठाकरे धमाकेदार डान्स शोमध्ये करताना दिसला. मात्र, अचानकच त्याचा कोरियाग्राफर बदलण्यात आला आणि त्याचा सर्व परिणाम हा त्याच्या परफॉर्मेंसवर झाला.

शिव ठाकरे हा शोच्या बाहेर पडत असताना मलायका अरोरा आणि फराह खान इमोशनल होताना दिसल्या. एकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मराठी असल्यामुळे शिव ठाकरे याला अशाप्रकारे डावलले जाते. दुसऱ्याने लिहिले की, मराठी माणूस विजेता होणार म्हटले की, अशा गोष्टी नेहमीच घडतात.

तिसऱ्याने लिहिले की, शिव ठाकरे या बेस्ट डान्स करत होता. चूक त्याची अजिबातच नाहीये, त्याची चूक हीच की, तो मराठी आहे. अजून एकाने लिहिले की, खरोखरच हे खूप जास्त चुकीचे आहे, मी हा फिनालेच आता बघणार नाहीये. शिव ठाकरे हा शोमधून बाहेर पडल्यापासून त्याचे चाहते हे सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करताना दिसत आहेत.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.