Video | अरे हा काय प्रकार? उर्फी जावेद हिचा ‘हा’ व्हिडीओ पाहून लोकांना फुटला थेट घाम, अभिनेत्रीने चक्क

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात अडकते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. बिग बाॅस ओटीटीमध्ये धमाला करताना उर्फी जावेद दिसली.

Video | अरे हा काय प्रकार? उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोकांना फुटला थेट घाम, अभिनेत्रीने चक्क
| Updated on: Sep 03, 2023 | 9:52 PM

मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed)  ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिला थेट तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या (Threats) देखील मिळाल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर धमक्यांचा काहीच परिणाम होत नाही. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासून मिळालीये.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. उर्फी जावेद हिच्यावर जरी लोक टिका करत असतील, तरीही सोशल मीडियावर बाॅलिवूडच्या तगड्या अभिनेत्रींना फॅन फाॅलोइंगमध्ये ती मागे टाकते. आपल्या चाहत्यांसाठी उर्फी जावेद ही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिने शेअर केले व्हिडीओ तूफान व्हायरल होतात.

नुकताच आता उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक खतरनाक व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही परत एकदा अतरंगी लूकमध्ये दिसली आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. हा उर्फी जावेद हिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने चक्क एका कॅरीबॅगमध्ये पाणी टाकले आहे आणि यामध्ये मासे सोडले आहेत. उर्फी जावेद हिने हे ‘ब्रा’सारखे तयार केले आहे. इतकेच नाही तर हेच उर्फी जावेद हिने ब्रा म्हणून घातले आहे. या लूकचा व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेद हिने लिहिले की, मछली जल की रानी है….

आता उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिला या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, अरे हा तर दुनियाचा आठवा अजूबा आहे.

दुसऱ्याने लिहिले की, हे फक्त आणि फक्त उर्फी जावेद हिच करू शकते. तिसऱ्याने लिहिले की, हे खूपच अति होतंय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ लोकांना अजिबात आवडला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us