AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरोखरच आराध्या बच्चनची झालीये प्लास्टिक सर्जरी?, ‘ते’ फोटो पाहून लोक हैराण, म्हणाले, इतक्या कमी..

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन जामनगरमध्ये पार पडले. या फंक्शनला जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकार हे आपल्या कुटुंबासोबत उपस्थित होते. अमिताभ बच्चन हे देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जामनगरमध्ये दाखल झाले. आता काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

खरोखरच आराध्या बच्चनची झालीये प्लास्टिक सर्जरी?, 'ते' फोटो पाहून लोक हैराण, म्हणाले, इतक्या कमी..
| Updated on: Mar 06, 2024 | 11:44 AM
Share

मुंबई : मुकेश आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी तूफान चर्चेत आहे. नुकताच गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन पार पडलंय. या प्री वेडिंग फंक्शनला विदेशातूनही पाहुणे पोहचले. आता या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार या प्री वेडिंग फंक्शनमध्ये धमाल करताना दिसले. हे प्री वेडिंग फंक्शन तब्बल तीन दिवस सुरू होते. पाहुण्यांसाठी खास राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. संपूर्ण बच्चन कुटुंब देखील या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले.

पार्टी होती अंबानींची पण सर्वाधिक चर्चा यावेळी रंगली ती म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या बच्चन हिची. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये आराध्या बच्चन ही खास लूकमध्ये दिसली आहे. पहिल्यांदाच आराध्याचे कपाळ दिसल्याचे अनेकांनी म्हटले.

दरवेळी एकाच हेअरस्टाईलमध्ये आराध्या बच्चन ही दिसते. यामुळे ऐश्वर्या राय हिला नेहमीच खडेबोल सुनावले जातात. मात्र, अंबानींच्या पार्टीमध्ये जबरदस्त लूकमध्ये आराध्या बच्चन ही दिसली. अचानक तिच्यामध्ये इतका जास्त बदल पाहून अनेकांनी थेट म्हटले की, आराध्या बच्चन हिची सर्जरी करण्यात आलीये. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

एकाने म्हटले की, आराध्या बच्चन हिची प्लास्टिक सर्जरी केलीये. खरोखरच आराध्या बच्चन हिची प्लास्टिक सर्जरी केली का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. कारण काही महिन्यांपूर्वी आणि आताच्या आराध्यामध्ये बरेच मोठे बदल असल्याचा दावा केला जातोय. आता आराध्याचे अंबानींच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होत आहेत.

आराध्या ही 12 वर्ष 3 महिन्यांचीच आहे. यामुळे तिची प्लास्टिक सर्जरी ही केली गेली नसावी असे, अनेकांनी म्हटले आहे. हेअरस्टाईल आणि मेकअपमुळे आराध्याचे लूक बदलल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आई वडिलांसोबत विदेशात जाताना आराध्या बच्चन ही दिसली. नेहमीच पापाराझी यांना पाहून पोझ देताना देखील आराध्या बच्चन ही कायमच दिसते.

Follow Us
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार