अक्षय कुमारच्या लेकीचे नग्न फोटो मागणाऱ्या विरोधात कठोर कारवाई, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

अभिनेता अक्षय कुमार याच्या लेकीचे नग्न फोटो मागणाऱ्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल पोलिसांनी मोठी अपडेट देत पालकांना महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे.

अक्षय कुमारच्या लेकीचे नग्न फोटो मागणाऱ्या विरोधात कठोर कारवाई, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
अभिनेता अक्षय कुमार
| Updated on: Apr 25, 2026 | 10:39 AM

ऑनलाइन गेमिंग दरम्यान अभिनेता अक्षय कुमारच्या अल्पवयीन मुलीकडून नग्न फोटो मागितल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या अल्पवयीन मुलीला ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळताना नग्न फोटो पाठवण्यास सांगितल्याच्या कथित प्रकरणात महाराष्ट्र नोडल सायबर सेलने एका आरोपीला अटक केली आहे. या अटकेची पुष्टी करताना, महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव म्हणाले की, अभिनेत्याने सायबर अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यत अभिनेत्याने सायबर अवेयरनेस कार्यक्रमात खुलासा केलेला, एका व्यक्तीने  ऑनलाईन गेम खेळताना मुलीला वाईट मेसेज पाठवला होता… अक्षय कुमार याने सांगितल्यानुसार, आरोपी व्यक्तीने मुलीकडून नग्न फोटो मागितले होते… अखेर पोलिसांनी व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची 13 वर्षीय मुलगी ऑनलाइन गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी संभाषण सुरू केले. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत सुर होतं. पण नंतर आरोपीने  कथितरित्या अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि अल्पवयीन मुलीकडे नग्न फोटोची  मागणी केली. यावर गंभीर दखल घेत, सायबर सेलने तात्काळ तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल ट्रकिंगच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याने इतर कोणत्याही मुलांसोबत असेच गैरवर्तन केले आहे का, हे निश्चित करण्यासाठी आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, व्यक्तीने नग्न फोटो मागितल्यानंतर मुलीने पालकांना सांगितलं. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

संबंधित धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी अन्य पालकांना देखील महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आपली मुलं मोबाईलवर काय  करत आहेत, कोणता ऑनलाईन गेम खेळत आहेत, कोणाशी बोलत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय आहेत की नाही… याबद्दल  पालकांनी माहिती ठेवावी… असा सल्ला पोलिसांनी पालकांना दिला आहे. एवढंच नाही तर, कोणताही संशयास्पद मेसेज किंवा वर्तन आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.. असं देखील पोलिसांनी सर्व पालकांना सांगितलं आहे.

 

Follow Us