AAP मध्ये मोठी फूट; 7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?
आम आदमी पार्टी (AAP) मध्ये मोठी राजकीय घडामोड घडत असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांच्या फुटीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, त्यांच्या विलिनीकरणाशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.
आम आदमी पार्टी (AAP) मध्ये मोठी राजकीय घडामोड घडत असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांच्या फुटीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, त्यांच्या विलिनीकरणाशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. संसदीय नियमांनुसार एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी किमान दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. आपच्या बाबतीत राज्यसभेतील एकूण 10 खासदारांपैकी 7 खासदार या निर्णयाच्या बाजूने असल्याने ही अट पूर्ण झाल्याचं मानलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर, राघव चड्ढा यांच्या पुढाकारातून संबंधित खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती समोर येत आहे. या गटाने राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे अधिकृत पत्र सादर केल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, आज हे सातही खासदार सभापतींची भेट घेणार असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या सर्व प्रक्रियेनंतर या खासदारांचा भारतीय जनता पक्षाच्या संसदीय गटात विलीन होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी काही राजकीय बदल घडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 25, 2026 12:53 PM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...

