AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

74 वर्षांपूर्वीचं गाणं, जे गाताना गायकाच्या तोंडातून आलेलं रक्त, घाबरलेले लोक, ऐकताच डोळ्यात येते पाणी

74 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं. जे गाण्यासाठी मोहम्मद रफी यांनी 15 दिवस घेतली होती मेहनत, स्टुडिओमध्ये गाताना गळ्यातून आले होते रक्त. आजही ते गाणं प्रचंड हिट. ऐकताच रडतात लोक.

74 वर्षांपूर्वीचं गाणं, जे गाताना गायकाच्या तोंडातून आलेलं रक्त, घाबरलेले लोक, ऐकताच डोळ्यात येते पाणी
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 25, 2026 | 1:25 PM
Share

Mohammed Rafi : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक असे गायक झाले आहेत, ज्यांच्या आवाजाची जादू आजही तितकीच ताजी आणि प्रभावी वाटते. या दिग्गजांमध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, राहुल देव बर्मन, किशोर कुमार आणि मुकेश यांचा समावेश होतो. मात्र या सगळ्या नावांमध्ये एक असं नाव आहे, ज्यांचा आवाज ऐकताच श्रोते एका वेगळ्याच भावविश्वात हरवून जातात. ते म्हणजे मोहम्मद रफी.

मोहम्मद रफी यांची गायकी म्हणजे भावना, ताकद आणि मधुरतेचा अद्भुत संगम होता. त्यांच्या आवाजात इतकी खोली होती की प्रत्येक गाणं थेट श्रोत्यांच्या मनाला भिडायचं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली पण काही गाणी अशी आहेत जी केवळ संगीत नसून इतिहास ठरली.

आजच्या आधुनिक संगीताच्या काळातही जुन्या गाण्यांची आवड कमी झालेली नाही. विशेषत 1950 आणि 60 च्या दशकातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यांमध्ये शास्त्रीय संगीताची छटा आणि भावनिक गहराई दिसून येते. त्यामुळेच नवीन पिढीही या गाण्यांकडे आकर्षित होते. अशाच एका गाण्याची कहाणी खूपच खास आहे.

‘ओ दुनिया के रखवाले’

1952 साली प्रदर्शित झालेल्या बैजू बावरा या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी ‘ओ दुनिया के रखवाले’ हे गाणं गायलं. हे गाणं त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्यासाठी त्यांनी तब्बल 15 दिवस मेहनत घेतली होती. या गाण्यातील उंच सुर गाठण्यासाठी त्यांनी खूप सराव केला.

रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांनी इतक्या जोरात आणि भावनेने गाणं सादर केलं की त्यांच्या गळ्यातून रक्त येऊ लागलं. ही घटना पाहून स्टुडिओमधील सगळेच हादरले. काही काळासाठी अशी भीती व्यक्त केली जात होती की ते कदाचित पुन्हा गाऊ शकणार नाहीत. मात्र रफी साहेबांनी हार मानली नाही.

या घटनेनंतर त्यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन केलं आणि अनेक हिट गाणी दिली. ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी त्यांनी एकूण पाच गाणी गायली होती, ज्यापैकी दोन गाणी त्यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत गायली होती. ‘तरपट हरी दर्शन को आज’, ‘ओ दुनिया के रखवाले’ आणि ‘गंगा की मौज’ ही गाणी त्या काळात प्रचंड गाजली.

Follow Us
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?.
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,.
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?.
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर.
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण.
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट.
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप.
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा....
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा.....
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं..
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं...