AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लव्ह सीन, भेदरलेली पूजा आणि हजार विचार, मग आमिर खानने जे केलं… ते भन्नाटच!

Pooja Bedi Aamir Khan Love Scene : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान या तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला. त्यावरून अनेक जण त्याच्यावर भडकले. अनेकांनी त्याला ट्रोल केले. त्याची कोस्टार पूजा बेदी सोबत त्याचे नाव जोडल्या जात होते. तिने आता आमिर खानविषयी एक खास सीक्रेट रिव्हिल केले आहे. महिला सहकलाकारासोबत आमिरचे खानचे वर्तन कसे होते याचा खुलासा तिने केला आहे.

लव्ह सीन, भेदरलेली पूजा आणि हजार विचार, मग आमिर खानने जे केलं... ते भन्नाटच!
पूजा बेदी, आमिर खान Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 13, 2026 | 10:09 PM
Share

‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमामुळे पूजा बेदी अनेकांच्या मनात घर करून गेली. तीच एक झलक , अदा अनेकांना घायाळ करून गेल्या. तिने या चित्रपटात श्रीमंत मुलीची भूमिका केली होती. पूजाचा बोल्ड लूक त्यावेळी चर्चेत होता. आमिर खानसोबतच्या तिची केमिस्ट्री दिसून आली. दोघांमध्ये जांगड गुत्ता सुरू असल्याची अफवाही त्यावेळी उठली. ही केमिस्ट्री जुळल्यानंतर ही जोडी पुढे आतंक ही आतंक या सिनेमातही दिसली. अनेक वर्षानंतर विक्की ललवानी याच्या खास शोवर पूजा बेदीने या अफवांवर मौन सोडले. तुम्ही गंमत करताय काय? असे म्हणत तिने आमिरसोबत अफेअरचा दावा फेटाळला.

लव्ह सीनबाबत पूजाने सांगितला तो किस्सा

आंतक ही आतंक या सिनेमाच्या शुटिंगचा एक किस्सा पूजा बेदीने शेअर केला. या सिनेमात तिची छोटी भूमिका होती. पूजा बेदीने सांगितले की, दोघांनी एक पॅशनेट लव्ह सीन शूट केला होता. पण हा सीन, दृश्य सिनेमातून हटवण्यात आली आणि तो सीन कधी प्रदर्शित झालाच नाही.

हा सीन करण्यापूर्वी काय घडलं, याची माहिती पूजाने दिली. फिल्म सिटीजवळील एका बंगल्यात शुटिंग सुरू होते. आता तर सर्वच जण मेकअप व्हॅनमध्ये जातात. पण त्यावेळी सीन शूट झाल्यानंतर सहसा कोणी व्हॅनिटी व्हॅनमध्ये जात नसे. एका रुममध्ये हा सीन शूट करण्यात येत होता. त्या खोलीत मी गेले. आमिरही आला. त्याठिकाणी एक बेड होता. आता या सर्व गोष्टी असताना माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. एक तरूण अभिनेत्री म्हणून मला प्रश्न पडतो की, बॉलिवूड म्हणजे नेमकं हेच आहे का? कुणालाही थोडं गोंधळल्यासारखं आणि भेदरल्यासारखंच होईल. मलाही तसंच वाटलं.

मग पुढं काय झालं?

आमिर खानने माझ्या चेहऱ्यावरचा तणाव चटकन ओळखला. आमिर हा शांतपणे उभा होता. मी पण तिथे शांतपणे बसलेली होती. मी त्याच्याकडे पाहत होते आणि तोही माझ्याकडे पाहत होता. त्यावेळी त्याने माझ्याकडे पाहिले आणि अचानक म्हणाला, बुद्धिबळ खेळशील? तो आणि मी अनेकदा चेस खेळलो आहे. त्याने चेसचा सेट आणला आणि तो बाहेर ठेवला.

आमिरने वातावरण हलकं फुलकं केलं. पूजाच्या मनावरील दडपण त्याने कमी केलं. माझ्या लक्षात आलं की तो एक चांगला सहकारी नट आहे. तो इतर वाईट सहकलाकारासारखा नाही असं पूजा म्हणाली. तिला सर्वात अखेरीस मसाबा मसाबा या नेटफ्लिक्स सीरीजमध्ये पाहण्यात आलं होते. 1991 मधील विषकन्या या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने आमिर खानसोबत जो जीता वही सिंकदर, याशिवाय 1993 मधील ‘लुटेरे’ आणि 1995 मधील सिनेमा ‘आतंक ही आतंक’ मध्ये काम केले होते.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल