AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Sawant | पूजा सावंत पुन्हा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज, ‘बळी’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंत आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सुखद अनुभव देण्यास सज्ज झाली आहे.(Pooja Sawant is all set to hit the silver screen again, playing a Important role in the film 'Bali')

Pooja Sawant | पूजा सावंत पुन्हा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज, ‘बळी’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका
| Updated on: Mar 25, 2021 | 4:11 PM
Share

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सुखद अनुभव देण्यास सज्ज झाली आहे. ‘बळी’ या आपल्या आगामी चित्रपटात ती वेगळी भूमिका साकारते आहे. ‘बळी’या चित्रपटाबद्दल त्यातील अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहिली असताना पूजाची त्यातील डॉक्टरची भूमिका हे या आतुरतेचे आणखी एक कारण आहे.

प्रमुख भूमिकेत आहे मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशी

‘जीसिम्स’ च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला ‘बळी’ 16 एप्रिल 2021 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘बळी’चे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून त्यात प्रमुख भूमिकेत आहे मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशी.

पूजा सावंत ही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते

आपल्या नाटयमय आणि नाविन्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखली जाणारी पूजा सावंत ही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘बळी’ हा पूजाचा विशाल फुरियाबरोबरचा दुसरा चित्रपट आहे. तिने ‘लपाछापी’ या त्याच्या गाजलेल्या आणि प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटात काम केले होते. निर्माते ‘जीसिम्स’ने पूजाचे पूर्णाकृती छायाचित्र असलेले ‘बळी’चे एक नवे पोस्टर नुकतेच प्रकाशित केले आहे.

पूजा साकारणार डॉक्टरची भूमिका

या पोस्टरमध्ये तिच्या हातात स्टेथोस्कोप आहे आणि त्यावरून या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत आहे, हे लक्षात येते. अत्यंत आश्वासक अशा तिच्या या लूकवरून प्रेक्षकांनाही या चित्रपटात आपल्याला दमदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार त्याचीही खात्री पटते. पूजाने आत्तापर्यंत आपल्या चाहत्यांना नेहमीच दमदार भूमिका आणि नाविन्यपूर्ण अभिनयाने जिंकले आहे आणि तिच रेष इथेही ओढली जाणार आहे.

‘बळी’मध्ये काम करण्याचं पूजाला समाधान

‘बळी’मध्ये काम करण्याचे समाधान फार मोठे आहे ते दोन कारणांसाठी. एक म्हणजे, विशाल हा असा दिग्दर्शक आहे की जो अभिनेत्यामधील 100 टक्के क्षमतेचा वापर करून घेतो आणि दुसरे म्हणजे या चित्रपटात मी जी डॉक्टरची भूमिका करत आहे ती या कथेचा एक अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. विशालचा पहिला थ्रिलर चित्रपट ‘लपाछपी’हा खूप यशस्वी ठरला होता आणि त्यात दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी फारच उजवी झाली होती. ‘लपाछपी’मध्ये त्याची दिग्दर्शकीय क्षमता अगदी जवळून पहिली होती आणि त्यामुळे त्याने जेव्हा या चित्रपटासाठी विचारले तेव्हा नाही म्हणायचे काही करणाच नव्हते, असं ती म्हणाली.

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती, दगडी चाळ, बोनस, सुभाष घाई यांचा हिंदी चित्रपट ‘विजेता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका करून स्वतःची अशी अमीट छबी निर्माण केली होती.

चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे

या बहुप्रतिक्षित अशा मराठी चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. ‘जीसिम्स’ने आत्तापर्यंत मोगरा फुलाला, बोनस आदी चित्रपट आणि वेब सिरीज समांतर 1 व 2 आणि नक्सलबारीची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

Neha Khan | ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहला प्रेक्षकांची पसंती, नेहा खानचा थक्क करणारा प्रवास

Photo : बोलके डोळे, कातिल नजर, अमृताचे फोटो पाहून घायाळ जिगर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.