Neha Khan | ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहला प्रेक्षकांची पसंती, नेहा खानचा थक्क करणारा प्रवास

अभिनेत्री नेहा खानचा थक्क करणारा प्रवास. (Neha Khan's astonishing journey)

  • Publish Date - 3:53 pm, Thu, 25 March 21
1/6
‘देवमाणूस’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एसीपी दिव्या सिंहच्या  एन्ट्रीने ट्विस्ट निर्माण झाला आहे.

2/6
गावाला गंडवणाऱ्या डॉ. अजितकुमार देवचे काळे धंदे दिव्या उघडकीस आणणार, असं वाटत होतं. मात्र आता खुद्द दिव्याच अजितच्या जाळ्यात फसताना दिसत आहे. दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

3/6
अभिनेत्री नेहा खानचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी. नेहाच्या आई-वडिलांचं लव्ह मॅरेज. धर्म वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही परिवारांनी त्यांना स्वीकारलं नाही.

4/6
नेहाच्या आईची परिस्थिती लग्नाच्या वेळी अत्यंत बिकट होती. नेहाच्या आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे तिच्या आईवर कुटुंबाची जबाबदारी होती. लग्नानंतर आपली परिस्थिती सुधारेल, या आशेने तिने आंतरधर्मीय असूनही विवाह केला. मात्र लग्नानंतर त्यांच्या स्थितीत फारसा फरक पडला नाही.

5/6
नेहा खान मूळ अमरावतीची. मुंबईत ऑडिशनला येण्यासाठी तिला खूप कसरत करावी लागायची. वडिलांना समजू नये, यासाठी ती छोटीच बॅग सोबत बाळगायची. फेसबुकवर ओळख झालेल्या ऑडिशन घेणाऱ्या लोकांना भेटायचे. कधी ट्रेन चुकली, तर पेपर टाकून मुंबई छशिमट स्टेशनवर झोपायचे. दोन-तीन वर्ष हा प्रकार केल्याचं नेहा सांगते.

6/6
किशोरी शहाणे, सतीश कौशिक यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या अमरजीत यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांन मदत केली आणि युवा हा जिमी शेरगिलसोबत पहिला सिनेमा मला मिळाला. बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटातून तिने काम केले आहे. आता देवमाणूस या मालिकेमुळे नेहा खान हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI