सलमान खानवर जीवापाड प्रेम, तर सुनील दत्तसोबत लग्नाची इच्छा; ही अभिनेत्री आजही सिंगल

अशी एक अभिनेत्री जिने बॉलिवूडमध्ये अनेक हीट चित्रपट दिले आहेत. पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. एवढंच नाही तर तिचे सलमान खानवर वेड्यासारखं प्रेम होतं. तिने या भावना व्यक्तही करून दाखवल्या होत्या. आजही ही अभिनेत्री सिंगलच आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊयात.

सलमान खानवर जीवापाड प्रेम, तर सुनील दत्तसोबत लग्नाची इच्छा; ही अभिनेत्री आजही सिंगल
Poonam Dhillon loved Salman Khan and she wanted to marry Sunil Dutt
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2025 | 2:54 PM

अनेक बॉलिवूड अभिनेत्री अशा आहेत ज्या वयाच्या पन्नाशीत किंवा साठीतही सिंगलच आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची तसेच त्यांच्या लव्ह लाईफबद्दलही खूप चर्चा झाली आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रचंड चर्चा झाली आहे. एवढंच नाही तर तिचे नाव सलमान खानमुळेही चर्चेत आलं होतं. तसेच या अभिनेत्रीला संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्याशी लग्न करण्याची इच्छा होती.

यश चोप्रा यांच्याशीही नाव जोडले होते

70 च्या दशकतील या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीचं प्रसिद्ध नाव होतं आणि आजही तिच्या चित्रपटांची चर्चा होते. तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. दरम्यान तिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी अभिनयात पदार्पण केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पूनम ढिल्लन आहे. पूनमने 1978 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट ‘त्रिशूल’ होता. दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी तिला बॉलिवूडमध्ये आणले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. एक काळ असा होता की तिचे नाव यश चोप्रा यांच्याशी देखील जोडले जाऊ लागले होते. पण, नंतर त्यांनी ही फक्त एक अफवा होती असं म्हटलं.

सुनील दत्तशी लग्न करायचे होते

पूनम ढिल्लनला एकेकाळी संजय दत्तचे वडील आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्याशी लग्न करायचे होते. दोघांनीही 1984 मध्ये आलेल्या ‘लैला’ चित्रपटात एकत्र काम केले होते, ज्यामध्ये सुनीलने पूनमच्या वडिलांची भूमिका साकारली होती. पूनमच्या विरुद्ध अनिल कपूर एका महत्त्वाच्या भूमिकेत होते. एकदा पूनमने चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक किस्सा सांगितला. अभिनेत्रीने सेटवर सुनील दत्तला सांगितले होते की जर ते लहान असते तर त्यांच्याशी पुनम यांनी लग्न केलं असतं.

मग निर्मात्यासोबत सेटलमेंट केली

सुनील दत्तशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पूनमने नंतर चित्रपट निर्माते अशोक ठकारियाशी लग्न केले आणि स्थायिक झाली. दोघांनी 1988 मध्ये लग्न केले. पण, हे नातं फार काळ टिकले नाही. नऊ वर्षांच्या लग्नानंतर 1997 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, अभिनेत्रीने पुन्हा लग्न केले नाही.आजही त्या सिंगलच आहे.

सलमानवर क्रश होता.

सलमान खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असताना पूनमचे लग्न झाले होते. त्यावेळी सलमानने बॉलिवूडमध्ये नुकतीच एन्ट्री केली होती. सलमानने 1988 मध्ये रेखाच्या ‘बीवी हो तो ऐसी’ चित्रपटात सहाय्यक भूमिका केली होती. त्यानंतर 1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. पूनम त्यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या सलमानवर खूप प्रेम होत्या. पूनमने एकदा सलमानला क्यूटही म्हटले होते आणि त्याच्या आकर्षणाचे कौतुकही केले होते. मात्र आता त्या सिंगलच आहेत.