AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prabhas: Prabhas: प्रभासच्या तब्येतीबाबत चाहत्यांना का वाटतेय चिंता? सर्जनची ‘ती’ पोस्ट पाहून चाहत्यांना धडकी

Prabhas: बाहुबली स्टार प्रभासच्या तब्येतीबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका ऑर्थोपेडिक सर्जनने त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत एक मेसेज लिहिला आहे. ही पोस्ट वाचून चाहत्यांनी कमेंट्स करत त्याच्याविषयी विचारणा केली आहे.

Prabhas: Prabhas: प्रभासच्या तब्येतीबाबत चाहत्यांना का वाटतेय चिंता? सर्जनची 'ती' पोस्ट पाहून चाहत्यांना धडकी
PrabhasImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2026 | 3:26 PM
Share

Prabhas: साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आरोग्याविषयी चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. हैदराबादच्या एका रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जनने त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी प्रभासच्या यशामागे काही वैयक्तिक त्याग असल्याचा उल्लेख केला आहे. याच पोस्टमुळे चाहत्यांनी प्रभासच्या आरोग्याबद्दल विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ‘बाहुबली’, ‘साहो’ आणि ‘सालार’ यांसारख्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान प्रभासला दुखापत झाली होती. गेल्या काही वर्षांपासून तो गुडघ्याच्या समस्येशीही झुंज देत आहे. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर फेब्रुवारीमध्ये सेटवर त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली होती.

हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक सर्जन यांनी हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘काही लोक आपल्या यशाने इतरांना प्रेरणा देतात, तर काही जण आपल्या विनम्र स्वभावाने कायमची छाप सोडतात.’ त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं आहे की ते प्रभासला वैद्यकीय उपचार पुरवत आहेत. ‘प्रभासला ओळखणं आणि त्याच्या आरोग्याची जबाबदारी घेणं हा एक आनंददायी अनुभव आहे. प्रचंड यश मिळवूनही तो अत्यंत साधेपणाने वागणारा, मनमिळाऊ आणि चांगल्या स्वभावाचा आहे. त्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि स्वभाव त्याला खरोखरच खास बनवतो. मी त्याला यश, उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देतो’, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

या फोटोमध्ये प्रभास डॉक्टरच्या बाजूला उभा राहून हसताना दिसत आहे. ‘जेव्हा तुम्ही एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे पाहता, तेव्हा तुम्ही फक्त त्यांचं यश पाहता, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी केलेलं वैयक्तिक त्याग पाहत नाही’, असं कॅप्शन या फोटोवर देण्यात आलं आहे. त्यावर लगेचच कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी प्रभासच्या तब्येतीबद्दल विचारण्यास सुरुवात केली. ‘प्रभासला नेमकं काय झालंय’, असं एकाने विचारलं, तर ‘प्रभासने आधी स्वत:ची काळजी घ्यावी, मगच शूटिंगला परतावं’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

प्रभास लवकरच संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरीट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो हनु राघवपुडीच्या ‘फौजी’साठी शूटिंग करत आहेत. याशिवाय नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’चा सीक्वेलसुद्धा प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...