प्रग्नेंट बायकोचे प्रदीप रावत यांच्यावर गंभीर आरोप, लग्नाच्या 5 महिन्यात घटस्फोट, अभिनेत्याच्या संसारात आलेलं वादळ?
प्रदीप रावत यांचं पहिलं लग्न पाच महिन्यात मोडलं, प्रेग्नेंट बायकोने केलेले गंभीर आरोप, संसार आलेल्या वादळावर अभिनेता स्वतःच म्हणालेला..., सध्या सर्वत

अभिनेते प्रदीप रावत यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. पण मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. प्रदीप यांनी फक्त हिंदी सिनेविश्वातच नाही तर, तामिळ, तेलुगू आणि नेपाळी सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. प्रोफेशनल आयुष्यात प्रदीप रावत यशाच्या शिखरावर पोहोचले. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक चढ – उतार पाहिले. प्रदीप यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहोचलेलं. तेव्हा अभिनत्याची पहिली पत्नी प्रेग्नेंट होती आणि त्यांच्या लग्नाला फक्त पाच महिने झालेले.
सांगायचं झालं तर, प्रदीप रावत यांनी स्वतःच त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलेला. पण त्यांच्या पहिल्या बायकोचं नाव काय होत आणि आता त्या कुठे आहेत आणि काय करतात याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. प्रदीप यांनी सांगितलेल, त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्यावर आत्याचाराचे खोटे आरोर केले होते. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार देखील दाखल करुन घेतलेली.
पहिल्या लग्नाबद्दल प्रदीप रावत म्हणालेले, ‘लग्नाच्या साडे पाच महिन्यात आमचा घटस्फोट झालेला. ती प्रेग्नेंट होती आणि तिच्या पोटात माझं बाळ होतं, तिने असं यासाठी केलं, कारण तिला माझ्याकडून मोठी रक्कम हवी होती. त्यामुळे तिने माझ्या आणि माझ्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली. माझ्यावर तिच्या कुटुंबियांनी देखील गंभीर आरोप केलेले, ‘याने आमच्या मुलीची दारुच्या नशेत मारहाण केली… त्यानंतर एका महिन्यात हे प्रकरण निवळलं… तिला तिचा दुसरा जोडीदार भेटला. तेव्हा ती माझ्या वकिलांकडे आली आणि गुन्हा कबूल केला. अशाप्रकारे आमचा घटस्फोट झाला…’, असा खुलासा प्रदीप यांनी केला.
प्रदीप रावत यांचं दुसरं लग्न
पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर प्रदीप यांनी दुसरं लग्न कल्याणी रावत यांच्यासोबत केलं. कल्याणी कायम लाईमलाईट पासून दूर राहिल्या, पण अनेक इव्हेंट्समध्ये त्या नवऱ्यासोबत दिसल्या… प्रदीप रावत आणि कल्याणी यांची पहिली ओळख ‘स्टालिन’ सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर पहिल्याच नजरेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले…
एका मुलाखतीत प्रदीप रावत यांनी सांगितलेलं की, कल्याणी यांचा मला स्वभाव काहीसा कठोर वाटलेला. तरीही, नशिबाने त्यांना एकत्र आणलं. एके दिवशी कल्याणी यांची गाडी बंद पडली आणि त्यांच्या मॅनेजरने प्रदीप यांना विचारलं की, त्यांच्यासोबत जाण्यासाठी ते एखाद्या कलाकाराला पाठवू शकतील का. प्रदीप यांनी संकोचतच होकार दिला, आणि ती कलाकार खुद्द कल्याणीच असल्याचं समोर आलं. घरी परतताना त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर, 2006 मध्ये त्यांनी विवाह केला. दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव विक्रमादित्य रावत असं आहे.