Upendra Limaye : साऊथमध्ये वेळेला किंमत!‘सात म्हणजे सातच!’ चित्रपटाच्या शूटिंगची शिस्त पाहून उपेंद्र लिमयेही झाले थक्क, म्हणाले…
'अॅनिमल' चित्रपटातील फ्रेडी पाटील या भूमिकेमुळे उपेंद्र लिमये यांची लोकप्रियता साऊथमध्येही पोहोचली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या वेळेच्या काटेकोर शिस्तीचे तोंडभरून कौतुक केले असून, तेथील शूटिंगचा एक खास अनुभव शेअर केला आहे.

अॅनिमल चित्रपटातील एका सेंकदाच्या रोलमुळे उपेंद्र लिमये देशभरात प्रसिद्ध झाले. त्यांच्या करिअरला एक वेगळीच दिशा मिळाली. या चित्रपटातील फ्रेडी पाटील ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी या भूमिकेच्या तेलूगू व्हर्जनसाठी देखील अफलातून डबिंग केलं होतं. त्यामुळे साऊथमध्येही त्यांची छाप पडली. त्यांची लोकप्रियता वाढली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दक्षिण भारताच्या चित्रपटसृष्टीतील कामाच्या शिस्तीचे कौतुक केले आणि याचसंबंधित आपला एक अनुभव सांगितला जो त्यांना प्रचंड आवडला.
साऊथमध्ये वेळेचं काटेकोर पालन
अभिजात मराठी फिल्मी ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमये यांनी साऊथ इंडस्ट्रितील शूटिंच्या वेळेबद्दल शिस्तीबद्दल एका किस्सा सांगितला. ते म्हणाले,’तिथे सकाळी 7 वाजताची शिफ्ट असेल, तर पहिला शॉट 7 वाजता किंवा जास्तीत जास्त 7.05 मिनिंटांनी सुरू होतो. याउलट आपल्याकडे 7 वाजता कलाकार सेटवर येतात. त्यानंतर त्यांची तयारी सुरू होते आणि मग शूटिंग सुरू होतं. असं उपेंद्र लिमये म्हणाले
उपेंद्र लिमये म्हणाले, ‘साऊथमध्ये 7 वाजताच्या शिफ्टला सात किंवा जास्तीत जास्त सात वाजून पाच मिनिटांनी पहिला शॉट रोल होतो. पण आपल्याकडे सात वाजता आर्टिस्ट येतात.मग तयार होतात. मग पुढे 8-8.30 ला शूटिंग सुरू होतं. पण असं तिथं नाहिये. तिथे सात म्हणजे सात.. जास्तीत जास्त 7.05 होतील, त्यापुढे नाहीचं. थोडावेळ शूट झालं की 9 वाजता ब्रेक होतो.
याआधीही प्रवीण तरडेंनी देखील साऊथच्या या कामाच्या शिस्तीचे कौतुक केले होते. अशी शिस्त आपण आजपर्यंत कुठेही पाहिलं नसल्याचं त्यांनीही सांगितलं होतं.
साऊथच्या चित्रपटांमध्ये उपेंद्र लिमये यांचे काम
उपेंद्र लिमये यांनी पेड्डी, कॉमरेड कल्याण आणि संक्रांती की वस्तूनाम अशा अनेक साउथ चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यांची प्रमुख भूमिका असलेला बंधू हा मराठी चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
