AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devkhel 2: प्राजक्ता माळीचा असा अवतार कधी पाहिलाच नसेल; ‘देवखेळ 2’चा अंगावर काटा आणणारा टीझर

Devkhel 2: प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या 'देवखेळ 2' या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये प्राजक्ताचा कधीही न पाहिलेला अवतार दिसून येत आहे. रहस्य, भय अन् थराराचा नवा खेळ या सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.

Devkhel 2: प्राजक्ता माळीचा असा अवतार कधी पाहिलाच नसेल; 'देवखेळ 2'चा अंगावर काटा आणणारा टीझर
देवखेळ 2 टीझर, अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीImage Credit source: Youtube
| Updated on: Aug 18, 2026 | 1:35 PM
Share

कोकणातल्या शंकासूर प्रथेवरून काल्पनिक कथा रचत ‘देवखेळ’ ही वेब सीरिज फेब्रुवारी 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजचा आता दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘देवखेळ 2’चा थरारक टीझर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्याच झलकने कथेविषयीची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी एका वेगळ्याच आणि गूढ अंदाजात दिसत आहे. त्यामुळे ‘देवखेळ’च्या दुसऱ्या भागात नेमकं काय पहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

प्राजक्ता माळीचा थरारक अवतार

‘देवखेळ 2’च्या टीझरची सुरुवातच गूढता निर्माण करणारी आहे. आजूबाजूला असलेलं भयावह वातावरण, रहस्यमय प्रसंग आणि पात्रांच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थता यांमुळे काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची जाणीव होते. या टीझरमध्ये कथेबाबत फार काही उघड केलं नाही, परंतु तरीही सीरिजची कथा अधिक गडद आणि थरारक दिशेने जाणार असल्याचे संकेत मिळतात. प्राजक्ता माळीचा लूक हा टीझरचा सर्वांत लक्षवेधी भाग ठरतो. आतापर्यंत प्रेक्षकांनी तिच्या विविध भूमिका पाहिल्या आहेत, मात्र ‘देवखेळ 2’मध्ये ती ज्याप्रकारे दिसत आहे, तो तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच वेगळा अनुभव असणार आहे.

‘देवखेळ’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भागाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. यावेळी कथा अधिक रहस्यमय, भयावह आणि थरारक करण्याचा प्रयत्न असल्याचं या टीझरवरून जाणवतं. भीती, गूढता आणि अनपेक्षित वळणं यांचा मेळ या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

पहा टीझर-

नवा मर्डर नवं रहस्य

‘जेव्हा मी देवखेळ वाचत होती, तेव्हाच मला समजलं होतं की दुसरा भाग येणार आहे. हा दुसरा भाग पहिल्यापेक्षाही अधिक रंजक असेल हेसुद्धा मला माहीत होतं, खासकरून सारिका म्हणून.. आणि पहा त्याची झलक. देवखेळला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार. घेऊन येत आहोत ‘देवखेळ 2′. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होणार, नवा मर्डर नवं रहस्य घेऊन येणार’, असं कॅप्शन देत प्राजक्ता माळीने हा टीझर शेअर केला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर प्राजक्ताच्या व्यक्तिरेखेभोवती नेमकं कोणतं गूढ दडलंय, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.

देवखेळच्या पहिल्या भागावर कोकणातल्या स्थानिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर हा वाद विधानसभेतही पोहोचला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन-खेळे या पौराणिक आणि खूप जुन्या हिंदू लोककलेचं या सीरिजमध्ये विपरित चित्रण केल्याचं आणि लोककलेतील शंकासूर या दैवताचं अपमानकारक चित्रण केल्याचं कोकणातल्या नागरिकांचं म्हणणं होतं. यामुळेच या वेब सीरिजला कोकणातून तीव्र विरोध करण्यात आला होता.

Follow Us
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता