
Priya Marathe Death: आयुष्यात कधी काय होईल काहीही सांगता येत नाही. आज सकाळी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची माहिती समोर आली आणि मराठी सिनेविश्वावर मोठी शोककळा पसरली. प्रिया मराठे हिच्या निधनानंतर कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी प्रिया हिने अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे अभिनेत्रीचं निधन झालं. प्रियाने मुंबई येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहते आणि अनेक सेलिब्रिटी सोशळ मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील प्रिया मराठे हिच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. प्राजक्ता म्हणाली, ‘आम्ही दोघींनी ‘एकापेक्षा एक’ अशा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केलं होतं. प्रिया एक अत्यंत गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेवायची…’
‘प्रियाने कधीच कोणाला त्रास दिला नाही. तिचं तिच्या कामावर नितांत प्रेम होतं… कोणी काहीही बोललं तरी तिने कधीच उलट उत्तर दिलं नाही… देव अशी चांगली माणसंच का नेते?…’ असा प्रश्न देखील प्राजक्ता माळी हिने यावेळी उपस्थित केला. सध्या प्रिया मराठे हिच्या निधनानंतर चाहते, मित्र परिवार यांच्यासह कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया हिने रविवारी सकाळी 4 वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून अभिनेत्रीवर कर्करोगाचे उपचार सुरु होते. पण कर्करोगाशी अभिनेत्रीची झुंज फेल ठरली. अभिनेत्री प्रिया मराठे हिने झगमगत्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. फक्त मराठी नाही तर, हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
प्रिया ‘तुझेच मी गीत गाते’ मालित मोनिका ही भूमिका साकारत होती. पण अभिनेत्रीने मध्येच मालिकेचा निरोप घेतला. मालिकेतून निरोप घेत असल्याचा व्हिडीओ देखील प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.